Breaking News

ओमायक्रॉन आणि कोरोनाबाधित सर्वाधिक एमएमआरमध्ये, नाशिकमध्येही शिरकाव आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता

मराठी ई-बातम्या टीम

कालच्या तुलनेत आज राज्यात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दुप्पट अधिक वाढ झाली आहे. तर तसेच मुंबईसह राज्यात ५ हजार हजार ३६८ इतके आढळून आले असून यातील सर्वाधिक रूग्ण हे मुंबई महानगर प्रदेशात ४ हजार ५०० इतके बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात देण्यात आली आहे.

ओमायक्रॉन बाधीत रूग्णांच्या संख्येतही दुपटीहून अधिक वाढ झाली असून मुंबईत काल ८५ बाधित आढळून आले होते. आज त्यात वाढ होत १९८ रूग्ण आढळून आले आहेत. यातील ३० रूग्ण हे आंतराष्ट्रीय प्रवाशी आहेत. मुंबई – १९०, ठाणे मनपा- ४ ,  सातारा, नादेंड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड  – प्रत्येकी १ असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात पुढील एक-दोन दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे निर्णय घेणार आहेत. यासंदर्भात आज झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले.

आजपर्यंत राज्यात एकूण ४५० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत:-

.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ३२७*
पिंपरी चिंचवड २६
पुणे ग्रामीण १८
पुणे मनपा  आणि ठाणे मनपा १२
नवी मुंबई, पनवेल आणि कल्याण डोंबिवली प्रत्येकी ७
नागपूर आणि सातारा प्रत्येकी ६
उस्मानाबाद
वसई विरार आणि नादेंड प्रत्येकी ३
औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी २
१० लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर,  कोल्हापूर प्रत्येकी १
११ एकूण ४५०
*यातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

यापैकी १२५ रुग्णांना  त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ३५५५ ७७९०३१ १६३७५
ठाणे ३७ १०१४६० २२३२
ठाणे मनपा २६३ १४६२५३ २१२४
नवी मुंबई मनपा २८० १२२९२७ २०११
कल्याण डोंबवली मनपा ७३ १५३८२० २८७३
उल्हासनगर मनपा १३ २२११४ ६६३
भिवंडी निजामपूर मनपा ११३४२ ४८९
मीरा भाईंदर मनपा १०७ ६०४२५ १२०६
पालघर १३ ५६६०४ १२३४
१० वसईविरार मनपा १०० ८२८२१ २०८८
११ रायगड ४६ ११८९३८ ३३९०
१२ पनवेल मनपा ७३ ७८८९० १४३५
ठाणे मंडळ एकूण ४५६६ १७३४६२५ ३६१२०
१३ नाशिक ३१ १६४६४४ ३७५८
१४ नाशिक मनपा ४७ २३८६१३ ४६५६
१५ मालेगाव मनपा १०१६५ ३३६
१६ अहमदनगर १४ २७४६७९ ५५२१
१७ अहमदनगर मनपा १२ ६८९६२ १६३६
१८ धुळे २६२१८ ३६२
१९ धुळे मनपा १९९६३ २९४
२० जळगाव १०७०२५ २०५९
२१ जळगाव मनपा ३२८९२ ६५७
२२ नंदूरबार ४००२० ९४८
नाशिक मंडळ एकूण १०७ ९८३१८१ २०२२७
२३ पुणे ९९ ३६९६८३ ७०३७
२४ पुणे मनपा ३०७ ५२६१४५ ९२६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७४ २७११८९ ३५२६
२६ सोलापूर १२ १७८७३६ ४१३४
२७ सोलापूर मनपा ३२७३७ १४७५
२८ सातारा १९ २५१६४४ ६४९६
पुणे मंडळ एकूण ५१२ १६३०१३४ १५ ३१९३०
२९ कोल्हापूर १५५४२३ ४५४४
३० कोल्हापूर मनपा १२ ५१६०८ १३०६
३१ सांगली १६४४३५ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २९ ४५८९० १३५२
३३ सिंधुदुर्ग ५३०३४ १४४८
३४ रत्नागिरी १२ ७९२०७ २४९६
कोल्हापूर मंडळ एकूण ६४ ५४९५९७ १५४२६
३५ औरंगाबाद ६२६०४ १९३५
३६ औरंगाबाद मनपा १९ ९३५४० २३२९
३७ जालना ६०८३४ १२१५
३८ हिंगोली १८४८९ ५०८
३९ परभणी ३४१९८ ७९३
४० परभणी मनपा १८२७१ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण ३३ २८७९३६ ७२२३
४१ लातूर ६८५०१ १८०१
४२ लातूर मनपा २३८८५ ६४४
४३ उस्मानाबाद १८ ६८१५५ १९८९
४४ बीड १०४१७६ २८४०
४५ नांदेड ४६५४७ १६२६
४६ नांदेड मनपा ४३९६१ १०३४
लातूर मंडळ एकूण २८ ३५५२२५ ९९३४
४७ अकोला २५५४० ६५५
४८ अकोला मनपा ३३२९३ ७७३
४९ अमरावती ५२५०३ ९८९
५० अमरावती मनपा ४३८१६ ६०९
५१ यवतमाळ ७६०४७ १८००
५२ बुलढाणा ८५६५३ ८१०
५३ वाशिम ४१६८३ ६३७
अकोला मंडळ एकूण १४ ३५८५३५ ६२७३
५४ नागपूर १२९५९९ ३०७५
५५ नागपूर मनपा ३१ ३६४३६० ६०५४
५६ वर्धा ५७३६५ १२१८
५७ भंडारा ५९९९७ ११२४
५८ गोंदिया ४०५३० ५७०
५९ चंद्रपूर ५९३९७ १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६५० ४७६
६१ गडचिरोली ३०४७९ ६६९
नागपूर एकूण ४४ ७७१३७७ १४२७४
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण ५३६८ ६६७०७५४ २२ १४१५१८

 

Check Also

चित्रपट आणि मनोरंजनास उद्योगाचा दर्जा देणारा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राचे जाळे विस्तारत असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *