Breaking News

Tag Archives: sunil prabhu

सरकार स्थिर होण्याआधीच शिवसेनेत एकमेकांविरोधात कुरघोड्या संभावित प्रतिस्पर्धी निर्माण होवू नये म्हणून मुख्यमंत्र्यांकडे परस्पर विरोधी तक्रारी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडी सरकारचे स्थानापन्न होवून दोनच दिवस झाले. मात्र शिवसेनेत आपल्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्याला मंत्री पदाची लॉटरी लागू नये यासाठी एकमेकांच्या विरोधात राजकिय षडयंत्र राबविण्याची सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विद्यमान राज्याच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातील …

Read More »

भुजबळांना शिवीगाळ, माज आलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अजित पवार यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेची विधानसभेत मागणीः कामकाज तहकूब

नागपूरः प्रतिनिधी नुकतेच जामिन सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपरोक्ष श्रीगोंदा येथील पोलिस उपनिरिक्षक महावीर जाधव यांनी शिवीगाळ केली. लोकप्रतिनिधींना अशा पध्दतीने शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना माज आलाय का? कशामुळे शिवीगाळ करतोय असा सवाल करत माज आलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत …

Read More »

“नाणार” जाणार असल्याचे जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होवू देणार नाही प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस आक्रमक : सभागृहाचे कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प जोपर्यंत सरकारकडून जाणार असल्याचे जाहीर करत नाही. तोपर्यंत कॉंग्रेस सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज दिला. बुधवारी नाणारवासियांनी विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतर हा प्रश्न मांडण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये श्रेय घेण्यावरून राजकिय कुरघोड्यांचे राजकारण चांगलेच रंगले. त्यातच आज …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विकास आराखाड्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप चिंताजनक शिवसेना मंत्र्यासह खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना दुबळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हरकती आणि सूचनांसाठी विकास आराखडा मराठीतून उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते,पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Read More »

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर शिवसेना विरूध्द भाजप, भाजप-सेना विरूध्द काँग्रेस मेस्माचे पाप आघाडी सरकारच्या काळातले भाजप-सेनेचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांची नियुक्ती कंत्राटी पध्दतीवर असूनही त्यांना मेस्मा कायद्याच्या खाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याप्रश्नावर शिवसेनेने आज सकाळपासूनच विधानसभेचे कामकाज रोखून धरत दिवसभर गोंधळ घालण्यात येत होता. मात्र दुपारनंतर शिवसेनेने सरकार विरोधातील आपला रोख बदलत या मेस्मा कायद्यास आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी …

Read More »

मेस्मा कायदा लागू करण्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न : विधानसभेचे कामकाज बंद पाडले

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेनेचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला मेस्मा कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर सभागृहात मेस्मा कायदा रद्द करण्याबाबतचा फलकही फडकाविला. शिवसेना आमदारांमुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य झाल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब …

Read More »

असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापणार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सल्लागार समिती गठीत करण्याचे कामगार मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३ कोटी ६५ हजार असंघटीत कामगारांसाठी ३१ मार्च पर्यंत कामगार सुरक्षा मंडळ स्थापन केले जाणार आहे. या मंडळांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही सल्लागार समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत शिवसेनेचे सदस्य सुनिल प्रभू, सुनिल राऊत, अशोक पाटील, …

Read More »

हमारी युती बनी रहेगी शिवसेना मुख्य प्रतोदांचे भाजपच्या मुख्य प्रतोदांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती …

Read More »

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लवकरच कायदेशीर संरक्षण मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शहरातील २०११ सालापर्यंतच्या झोपडीधारकांना कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तसेच त्या संदर्भात सरकारकडून कायदा करण्यात आला असून तो कायदा राष्ट्रपतींकडे अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यावर लवकरच राष्ट्रपतींची सही होणार असून या झोपडीधारकांना कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत …

Read More »

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची सीआयडीमार्फत चौकशी गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे विधानसभेत आश्वाासन

मुंबई : प्रतिनिधी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे  (एसआरए) माजी मुख्याधिकारी विश्वास पाटील यांनी केलेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल महिन्याभरात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे आश्‍वासन गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत दिले. विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य …

Read More »