Breaking News

Tag Archives: shivsena

मेट्रोच्या भुर्दंडाचे दहा हजार कोटी ठाकरेंकडून वसूल करा

उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या बालिश हट्टामुळेच मेट्रो कारशेडचे काम रखडल्यामुळे मुंबईकरांवर दहा हजार कोटींचा वाढीव बोजा पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुंबईद्रोह असून राज्याबद्दल उद्योगक्षेत्रात संशयाचे वातावरण तयार करून आता महाराष्ट्र द्रोह केला जात आहे, असा थेट आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुंधवारी …

Read More »

नारायण राणेंची टीका, वैफल्यातून भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न

भाजपाशी विश्वासघात करत महाराष्ट्रात स्थापन केलेली सत्ता हातून गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सर्रासपणे जनतेच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा उद्योग सुरु केला आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा मुख्यालय …

Read More »

अखेर ठरलं वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची युती

आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युती बाबत सकारात्मक चर्चा झाली असून वंचित आघाडीच्या वतीने सकारात्मकता कळविण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी चौथा घटक पक्ष असेल की, वंचित आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटासोबत असेल याबाबत स्पष्टता होणार असल्याची माहिती आघाडीच्या प्रवक्त्या रेखा ठाकुर …

Read More »

आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, फडणवीसांच्या त्या बैठकीनंतरच वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये एमआयडीसीने अनिल अग्रवाल यांना पत्र लिहिल्याचे दाखविले जाहिर

गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील जवळपास चार मोठे प्रकल्प राज्यातून गुजरातला स्थलांतरीत झाले. विशेष म्हणजे सर्व प्रकल्प शिंदे-फ़डणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतरच गेल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातून गुजरात गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

संजय राऊत यांना समन्स, हाजीर हो

पत्राचाळ प्रकरणी नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना अलीकडेच जामीन मिळाला. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा राजकियदृष्ट्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावले असून १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर …

Read More »

विधिमंडळ समितीची बैठक आता पुढच्या महिन्यातः अधिवेशन एक आठवड्याचे?

मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …

Read More »

राज ठाकरेंच्या त्या टीकेवर संजय राऊत म्हणाले, मॅच्युअर झालात थोडं पुढे पहा…

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर मनसेच्या गटप्रमुखांचा मेळावा गोरेगांव येथील नेस्को मैदानावर पार पडला. या मेळाव्या दरम्यान राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच या तिघांच्या बोलण्याची नक्कलही करून दाखविली. त्यावरून शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे …

Read More »

राज ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यपाल, राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे

भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्या माफीनाम्याचे पत्र जाहिर करत टीका केली. या टीकेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्यावर टीका केली. अरे तुझी लायकी तर आहे का? असा सवाल करत गुळगुळीत मेंदूचा राहुल गांधी असल्याची टीका केली. गोरेगांव …

Read More »

ठाकरेंच्या आव्हानावर शिंदे गटाच्या संजय गायकवाडांचे प्रतिआव्हान, एक तरी पुरावा दाखवा

नुकत्याच चिखली येथे झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान देत म्हणाले काही जण रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. हे मी म्हणालो नाही तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचे म्हणाले. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल तर जाहिर सांगावं की, …

Read More »

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नाराजांची नावे घेत राणे बंधूवर साधला निशाणा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तास्थानी विराजमान होऊन जवळपास चार महिने झाले. या चार महिन्यात फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे शिंदे गटाबरोबर भाजपामधील अनेक आमदारांचे लक्ष्य लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील अनेक आमदारांना पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून आधीच नाराज आहेत. तसेच राज्यमंत्रीचीही अद्याप नियुक्ती झाली नाही. …

Read More »