Breaking News

Tag Archives: shambhuraj desai

डिजीटल माध्यमासाठी केंद्राप्रमाणे महाराष्ट्र शासन धोरण स्वीकारण्याचा विचार करेल मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

केंद्र सरकारने डिजीटल माध्यमासाठी काही वेगळे धोरण तयार केले असेल, काही वेगळे निकष ठरवले असतील तर त्याचे अवलोकन केले जाईल आणि त्यानुसार राज्याच्या धोरणात बदल केला जाईल, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. धीरज लिंगाडे यांनी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर मंत्री शंभूराजे देसाई उत्तर …

Read More »

परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या वाढविणार पण… मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एकूण ५० विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य अभिजित वंजारी यांनी याबाबतचा …

Read More »

बार्टीच्या प्रश्नावरून भाजपा आणि पवार गटाच्या नेत्यांनी धरले शिंदे गटाच्या मंत्र्याला कोंडीत अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आश्वासन उत्तर सुधारून देण्याचा प्रयत्न

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबत आणि त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे विधानसभेत दिसून आले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत …

Read More »

पाटण तालुक्यातील १२८ गावांतील १२२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय

राज्य शासन हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देणारे शासन आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाने लोकाभिमुख विविध निर्णय घेतल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावांतील १२२ कोटी ५९ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे ई – भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात २५ टक्क्यांनी वाढ मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. या विभागाच्या महसूलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच अवैध मद्य निर्मिती व वाहतूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थांबवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. …

Read More »

प्रसारमाध्यमातील जाहिरात कोणी दिली? शंभूराज देसाई म्हणाले, तो अज्ञानी…अज्ञात आहे…

राज्यातील बहुतांश वर्तमान पत्रांमध्ये आज मंगळवारी १३ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याची भली मोठी जाहिरात पाहून भाजपामधील अनेक नेत्यांना धक्का बसला. त्यातच ही पसंतीची आकडेवारी एका सर्व्हेद्वारे मिळाली असल्याचा दावाही या जाहिरातीमध्ये करण्यात आली. मात्र या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता प्रशासनच जनतेच्या दारी जाणार 'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी …

Read More »

संजय राऊतांच्या त्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या मंत्र्याने लगावला टोला, ते अंतरयामी झाले का ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हलविण्याची पडद्यामागे हालचालीच्या वक्तव्यावर लगावला टोला

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटविण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरु असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केले. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला अपेक्षित असलेले जनमत निर्माण करण्यात शिंदे हे कमी पडत असल्याचे वक्तव्य केले. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या त्या गौप्यस्फोटावर खोचक …

Read More »

तळीरामांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी महसूल यंदाच्या वर्षी २१ हजार कोटींचा महसूल मिळाला

राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात सरत्या आर्थिक वर्षात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७,५०० कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता, सन २०२२-२३ या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने २१,५०० कोटी रुपये …

Read More »

शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा, अवैध दारू दुकानांवर आता ड्रोन मार्फत नजर अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणणार

राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विधानसभा सदस्य ॲड. आकाश फुंडकर, डॉ. देवराव होळी, पंकज भोयर यांनीही प्रश्न उपस्थित केले. मंत्री देसाई …

Read More »