Breaking News

Tag Archives: shambhuraj desai

राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची नोकरभरती पाच महिन्यात पूर्ण करणार ६६७ पदे लवकरच भरणार- उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या ५ महिन्यांत वर्ग ३ आणि ४ च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण ६६७ पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न …

Read More »

मंत्री शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, मॉर्फींग व्हिडिओप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सर्वपक्षियांच्या मागणीवर शिंदे-फडणवीस सरकारचा तात्काळ निर्णय

दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सदरचा व्हिडिओ हा मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी करत यामागे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्त्ये असल्याचा आरोपही केला. त्यानंतर या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आज सकाळी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव, …

Read More »

भाग-१: मुख्यमंत्र्यांच्या शहरातील जिल्हा रूग्णालयात मोठा आर्थिक घोटाळा, आरोग्यमंत्री-पालकमंत्री गप्पच कॅग ऑडिटमध्ये ९० हजाराची मशिन ६ लाख ६१ हजारांना विकत घेतली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच भ्रष्टाचाराने बरबटलेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भ्रष्टाचाराबाबत स्वतः केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅगने केलेल्या ऑडिटमध्ये उघडकीस आले आहे. मात्र याबाबतचा अहवाल उपसंचालक कार्यालय आणि आरोग्य मंत्री कार्यालयास पाठवून दिल्यानंतरही त्याबाबतची कोणतीही कारवाई आरोग्य मंत्री डॉ.तानाजी …

Read More »

दीपक केसरकर म्हणाले, अब्दुल सत्तार अनेकवेळा गंमतीने बोलत असतात… तर शंभराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माग घेतील अनं समजही देतील

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली या प्रकरणावरुन लक्ष्य केले. तसेच महिला खासदाराबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबतही अधिवेशनात नाराजी व्यक्त केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या विरोधात कट रचला …

Read More »

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मंत्री शंभूराज देसाई यांचे आश्वासन

बनावट खत विक्री करणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक नियुक्त करून बी-बियाणे, खते यांचे गोडाऊन तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येतील. अशा बनावट खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आजच दिल्या जातील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. बुलढाणा शहरातील सागर कृषी केंद्रात डीएपी खताची पिशवी …

Read More »

चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती

नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सचिन अहिर यांनी …

Read More »

पवना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची कार्यवाही होणार, पण न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटप प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रकरण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले असल्याने जमीन वाटपाची कार्यवाही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी न्यायालयीन आदेश तपासून आणि निर्णयाचा आदर राखून काही मार्ग काढता येईल का, या संदर्भात शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री …

Read More »

शिंदे गटाच्या उद्यमशील मंत्र्याचा असाही फंडा, बोलवा बैठक द्या दम, अन् घ्या ‘धनलक्ष्मी’ लॉटरी कंपन्या आणि विभाग प्रशासन वैतागले

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकते शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून चार मोठे उद्योग निघून गेले. त्यावरून राज्यातले राजकिय वातावरणही चांगलेच तापले. मात्र या मागील चार महिन्यात शिंदे गटाच्या एका उद्यमशील उद्योगी मंत्र्याच्या कारभाराने खाजगी उद्योजक आणि त्यांच्या विभागाचे प्रशासन चांगलेच वैतागले असून या मंत्र्यांना कोणी तरी आवरा …

Read More »

संजय राऊत म्हणाले, मंत्री महोदय, ही धमकी समजायची का? शंभूराज देसाई यांच्या आव्हानवर संजय राऊत यांचा पलटवार

  कर्नाटकातील भाजपा सरकारचे मुख्यमंत्री  बसवराज बोमेमई यांचे वक्तव्य आणि कर्नाटकच्या कुरापती यामुळे गेली अनेक वर्ष चाललेला आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद पुन्हा तापला आहे. या कुरापतीवरून शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले आहे. शिवरायांचा अपमान महाराष्ट्राचे सरकार सहन करीत आहे. सीमावादावर कर्नाटक …

Read More »

कर्नाटकातील हल्ल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, पंतप्रधान आणि अमित शाहच्या कानी घालणार महाराष्ट्र सांम्यजसाची भूमिका घेतेय

कर्नाटकच्या आगळीकीनंतरही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कर्नाटकबाबत चकार शब्द काढला जात नाही. आणि महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतरही किमान कर्नाटकला इशारा देण्याचे सोडाच उलट शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कानावर घालणार असल्याचे वक्तव्य करत आपली चमडी बचावू भूमिका दाखविली आहे. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज …

Read More »