Breaking News

मंत्री शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, मॉर्फींग व्हिडिओप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सर्वपक्षियांच्या मागणीवर शिंदे-फडणवीस सरकारचा तात्काळ निर्णय

दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सदरचा व्हिडिओ हा मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी करत यामागे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्त्ये असल्याचा आरोपही केला. त्यानंतर या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आज सकाळी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव, भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी, भारती लव्हेकर यांनी याप्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत कऱण्याची मागणी केली. त्यानुसार संध्याकाळी विधानसभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी यासंपूर्ण प्रकरणाची चौकशी ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका यांच्या मॉर्प केलेल्या व्हिडीओ प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी लाऊन धरत सत्ताधारी पक्षातील आमदारांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण केला. परिणामी विधानसभेचे काम १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी संबंधितांचे मोबाइल ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी सत्ताधाऱ्याकडून करण्यात आली.
मुंबईत दोन दिवसांपूर्वी एका माजी नगरसेविकेच्या मॉर्प केलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी केल्याप्रकरणी आमदार यामिनी जाधव यांनी प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली. जाधव यांच्या या मागणीला आमदार मनिषा चौधरी यांनी पाठिंबा दर्शवित या महिलेचा संसार उद्धवस्त होऊ शकतो. संपूर्ण राज्यात काही दिवसांपूर्वी महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर अशाप्रकारची घटना समोर येणे हे निंदनीय असल्याचे यावेळी नमूद केले. या व्हिडीओ कोणी मॉर्प केला हे शोधून काढून त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील जवळपास सर्वच पक्षाच्या आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी १० मिनिटांसाठी सभागृहाचे काम स्थगित केले.

त्यानंतर आमदार भारती लव्हेकर यांच्यासह इतर अनेक आमदारांनी या प्रश्नी कारवाई करण्याची मागणी केली. लव्हेकर यांनी संबंधितांचे मोबाइल जप्त करुन कोणत्या कंपन्यांचा यात सहभाग आहे, हे शोधण्याची मागणी केली. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही याप्रकरणी पुढे येत अशाप्रकारे व्हिडीओ मॉर्प केला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी केली. यावर राज्य सरकारला आदेश देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला गंभीर दखल घेत निवेदन करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार आज संध्याकाळी शंभूराज देसाई यांनी व्हि़डिओ मॉर्फींग प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच मॉर्फिंग करण्यात आलेला व्हिडिओ हा मिठी नदीच्या शुध्दीकरणाच्या कार्यक्रमानंतर काढण्यात आलेल्या बाईक रॅली काढण्यात आली होती. त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचा खुलासा करण्यात आला.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून त्यामध्ये ठाकरे गटाचा सोशल मिडीया सांभाळणारा एक पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *