Breaking News

Tag Archives: sachin sawant

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी …

Read More »

…तर मग नरेंद्र मोदींना काळ्या पाण्याची शिक्षा द्यावी लागेल ! विनोद तावडेंच्या आरोपाला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे उत्तर

मुंबई: प्रतिनिधी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची त्याचे उत्तर द्यावे, जनता वाट पहात आहे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी म्हणाले होते. तसेच पाच वर्ष खोटं बोलून …

Read More »

भाजपच्या गोयल यांच्या युनायटेड फॉस्फरसच्या उपाध्यक्षा व्हीजेटीआयच्या अध्यक्ष काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणली. त्यानंतर भाजपच्या पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांच्या या कंपनीच्या उपाध्यक्षा सँड्रा आर. श्रॉफ यांची व्हीजेटीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे ही नियुक्ती भाजपचे सरकार आल्यानंतर …

Read More »

त्या प्रचार साहित्याशी भाजपचा संबध नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी खार येथे काल निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपाशी काहीही संबध नाही, हे आमचे प्रचार साहित्य नसल्याचा खुलासा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. युनायटेड फॉस्फरस कंपनीच्या कार्यालयात भाजपच्या प्रचार साहित्याची छपाई होत असल्याचा भांडाफोड काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. तसेच याप्रश्नी पत्रकार परिषद घेत ही कंपनी …

Read More »

विषप्रयोग करणा-या युनायटेड फॉस्फरस कंपनीशी भाजपची भागीदारी देवनार डंपिंग ग्राऊंडमधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारातः काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी बोगस कीटकनाशके तयार करून विदर्भात ४० शेतक-यांच्या मृत्यूस आणि शेकडो शेतक-यांच्या विषबाधेस कारणीभूत असलेल्या युनायटेड फॉस्फरस लिमीटेड कंपनीशी भाजपची भागीदारी असल्यानेच या कंपनीच्या कार्यालयात भाजपचे प्रचार साहित्य निर्मिती सुरु होती. तसेच देवनार डंपींग ग्राऊंड मधील भ्रष्टाचाराचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरला जात असल्याचा आरोप करून या संपूर्ण प्रकाराची सीबीआय …

Read More »

उच्च न्यायालयाने काढलेले वाभाडे मुख्यमंत्र्यांसाठी लज्जास्पद काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे संतापून उच्च न्यायालयाने राज्यातील पोलीस यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत. उच्च न्यायालयाने आपल्या १४ मार्च २०१९ च्या आदेशात सरकारवर आसूड ओढलेले आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणेची कामगिरी पूर्णपणे निराशाजनक असून उच्च न्यायालयाने वापरलेल्या प्रत्येक शब्दातून उद्वेग दिसून येत …

Read More »

नावाअगोदर चौकीदार लावणा-या चोरांपासून सावधानतेचा इशारा पोलिसांकडून त्याची चारित्र्यतपासणी करून घेण्याचे काँग्रेसचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी अनेक चोर, गुन्हेगार हे स्वतःला चौकीदार म्हणवू लागल्याने देशात अभूतपूर्व असुरक्षिततेचे वातावरण तयार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या पहारेक-यांकडेही लोक संशयाने पाहू लागल्यामुळे प्रामणिक पहारेक-यांची मनस्थिती ही भांबावल्यासारखी झाली आहे. जनतेने कोणालाही पहारेक-याची नोकरी देण्याआधी पोलिसांकडून त्याची चारित्र्य तपासणी करून घ्यावी …

Read More »

सरकारी जाहीरातींमुळे आचार संहितेचा भंग होतोय जाब विचारून गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी प्रचाराच्या जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला जाब विचारून संबधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

भ्रष्टाचारप्रकरणी महिला व बालविकास मंत्र्यांची हकालपट्टी करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी महिला व बालविकास विभागातर्फे घरपोच आहाराचे सुमारे ६ हजार ३०० कोटी रूपयांचे कंत्राट सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून सरकारचे तोंड काळे केले आहे. याच निर्णयाद्वारे बालकांना शिजवलेले गरम अन्न देण्याऐवजी प्रिमिक्स पाकिटे देण्याचे कंत्राट सरकारने याच माफियांना दिले होते. ते ही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या संपूर्ण प्रकरणात प्रचंड …

Read More »

मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि ४० चोरांची टोळी?

गिरीष बापट यांची हकालपट्टी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी मुंबईः प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी …

Read More »