Breaking News

Tag Archives: sachin sawant

मुंबई महानगरात ९ लाख बोगस मतदार

कारवाईचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ९ लाख बोगस मतदार असून या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली. त्यावर या ९ लाख बोगस मतदारांची नावे तपासून काढून …

Read More »

सरकारच्या पाठिंब्यामुळेच कट्टरतावाद्यांकडून अल्पसंख्यांकावर हल्ले

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी कोल्हापूरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी गेलेल्या ख्रिश्चन धर्मियांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि …

Read More »

पंतप्रधान मोदी, रिलायन्सच्या अनिल अंबानींची नार्को टेस्ट करा

ठाणे : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख आदी कोणीही सहभागी झालेले नव्हते. या खरेदी व्यवहारात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच छिंदमचा विजय काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरून महाराजांचा घोर अवमान करणारा श्रीपाद छिंदम सरकारच्या छुप्या पाठिंब्यामुळेच निवडणूक जिंकला असून त्याचा विजय शिवरायांच्या पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा आहे. अशी कठोर प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले …

Read More »

शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनी माहितीसाठी आपल्याच पक्षाचे मुखपत्र वाचावे दिशाभूल करण्याऐवजी गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची काँग्रेस प्रवक्ते सावंत यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी थेट परदेशी गुंतवणुकीच्या संदर्भातील अतिरंजीत व खोटे आकडे देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याऐवजी सरकारने गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करून सुभाष देसाई यांनी सरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी दैनिक सामना वाचावा असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे. गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेस …

Read More »

मोदींनी जाहिर केलेली दुष्काळमुक्त गावे ८ दिवसांत दुष्काळसदृश कशी झाली? राज्यातील ३१ हजार ०१५ गावांतील पाणी पातळीत घट म्हणजे घोटाळा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शासनाच्या म्हणण्यानुसार, जलयुक्त शिवार अभियानाला एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यात लोकसहभाग १० टक्के देखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा दडविण्याकरिता सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त म्हणून जाहीर केलेल्या २५ हजार गावांची नावे जाहीर करा जलयुक्त शिवार नव्हे भ्रष्टाचाराचा मालयुक्त शिवार असल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. परंतु राज्यात जवळपास २०१ तालुक्यातील किमान २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावांची यादी जाहीर …

Read More »

राज्यातील २५२ तालुक्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा अहवाल

मुंबईः प्रतिनिधी यंदाच्या वर्षी मराठवाडा, विदर्भात पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नाही. मार्च महिना यायला अद्याप चार महिन्याचा कालावधी अद्याप शिल्लक राहीलेला असतानाच या दोन्ही विभागातील विहीरी, नद्या, नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास …

Read More »

नाणार प्रकल्पविरोधी सभेसाठी राहुल गांधी येण्याची शक्यता प्रकल्पग्रस्तांनी घेतली दिल्लीत राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प विरोधाच्या लढ्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही सहभागी व्हावे यासाठी नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज शनिवारी नवी दिल्ली येथे जावून त्यांची भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांसोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी …

Read More »

भाजपच्या महामेळाव्याचा उत्सव शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कर्जमाफी योजनेतून ५० लाख शेतक-यांना वगळल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयाचे आत्महत्यालय करणा-या भाजपला उत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार नसून कर्जमाफी योजनेतून जवळपास ५० लाख शेतक-यांना वगळणारे फडणवीस सरकार उत्सव साजरा करून शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित करित असताना भारतीय …

Read More »