Breaking News

Tag Archives: Rbi

परकीय चलनाच्या साठ्यात घट, ११ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली परकीय चलनाच्या साठ्यात घट, ११ आठवड्यातील नीचांकी पातळी गाठली

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. परकीय चलन साठा ८ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात ४.९९ अब्ज डॉलरने घसरून ५९३.९० अब्ज डॉलरवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. याआधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा ४.०४ अब्ज डॉलरने वाढून ५९८.८९ अब्ज डॉलर झाला होता. रिझर्व्ह बँकेच्या …

Read More »

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३३ टक्के दराने परतफेड शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ च्या अदत्त शिल्लक रकमेची ९.३३ टक्के दराने २२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २३ ऑक्टोबर २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. शासकीय विनियमानुसार दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती …

Read More »

दहा बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, तपासा यादी स्वप्नातील घर आकारास येऊ शकेल, फक्त तुम्ही स्वस्त गृहकर्ज...

स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक वेळा घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बँकांमध्ये गृहकर्जाच्या व्याजदरात चढ-उतार पाहायला मिळत होते. गृहकर्जाच्या व्याजदरातील चढ-उतार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्णयांवर अवलंबून असतात. रिझर्व्ह बँक (RBI) ने मे २०२२ पासून रेपो …

Read More »

आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, गोल्ड बाँडची दुसरी मालिका खुली दुसरी मालिका ११ सप्टेंबरपासून सुरु

आजपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून स्वस्त सोने खरेदी संधी आरबीआयने उपलब्ध करून दिली आहे. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना २०२३-२४ ची दुसरी मालिका सोमवारपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. यावेळी सोन्याचा भाव प्रति १ ग्रॅम ५,९२३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाइन आणि …

Read More »

एफडीवर मिळतोय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर या बँकांच्या एफडी फायदेशीर, रेपो दरात कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आयबीआयच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर बँक ग्राहकांना एफडी ठेवींवर अधिक व्याजदर मिळण्यास अधिक वेळ मिळाला आहे. सध्या, अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना तसेच सामान्य ग्राहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. आरबीआयने गेल्या ३ वेळा रेपो दरात …

Read More »

त्या आरोपावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण, त्या माहितीचा चुकिचा अर्थ लावला

बाजारातून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, केंद्रीय बँकेने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत ८८,०३२.५० कोटी रुपये आहे, असा एका आरटीआय अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा …

Read More »

आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर एसबीआयकडून २०००च्या नोटा बदलण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जारी फक्त २००० हजारच्या १० नोटा आणा आणि न्या बदलून

नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थात आरबीआयने एक परिपत्रक जारी करत देशातंर्गत बाजारात २००० हजार रूपयांच्या नोटां अवघ्या ६ टक्के इतक्याच असल्याचे स्पष्ट करत. तसेच या नोटा सुरुवातीला ६७ टक्के इतक्या होत्या. मात्र मागील पाच वर्षात नोटांचा वापर बाजारातून कमी झाल्याचे दिसून आल्याने २००० रूपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय जारी केला. …

Read More »

आर्थिक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयकडून राज्यातील ‘या’ बड्या बँकावर कारवाई भाजपाचे माजी मंत्री देशमुख यांची लोकमंगल, आरबीएल आणि रायगड जिल्हा सहकारी बँक व एचएफसी बँकेलाही ठोठावला दंड

आर्थिक वर्ष संपत आल्याने खाजगी, सहकारी तत्वावरील बँकाकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटप प्रकरणी आणि सादर करण्यात आलेल्या लेखापरिक्षातील खात्यातील आकडेवारीची माहिती आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेला सादर करावी लागते. मात्र रिझर्व्ह बँकेला सादर कऱण्यात आलेल्या लेखा परिक्षण अहवालात ८ सहकारी आणि खाजगी बँकांच्या व्यवहारांमध्ये आयरबीआयने निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात …

Read More »

आर्थिक वर्ष संपण्यास फक्त ९ दिवस, सुट्टीच्या दिवशीही बँका उघड्या राहणार मात्र १ आणि २ एप्रिलला बँकामध्ये कामकाज नाही

चालू २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे नऊ दिवस शिल्लक उरले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. या काळात वर्षभरात झालेल्या सर्व खर्चाची गणना केली जाते. सर्व खात्यांचा हिशेब मार्च महिन्यातच केला जातो, त्यानंतर मग ती बंद केली जातात. त्यामुळेच रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी सर्व बँका खुल्या …

Read More »

अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा

नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या …

Read More »