Breaking News

त्या आरोपावर आरबीआयने दिले स्पष्टीकरण, त्या माहितीचा चुकिचा अर्थ लावला

बाजारातून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, केंद्रीय बँकेने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत ८८,०३२.५० कोटी रुपये आहे, असा एका आरटीआय अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे असे झाल्याचे केंद्रीय बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून ५०० रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. रिझर्व्ह बँकेला प्रिंटिंग प्रेसमधून दिलेली प्रत्येक नोट मोजली जाते, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. यासाठी मजबूत यंत्रणा आहे. आरबीआयने लोकांना अशा प्रकरणांत केवळ मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी काही प्रश्न विचारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. प्रतिसादात नवीन डिझाईन असलेल्या ५०० रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्याची किंमत ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. देशातील तीन प्रिंटिंग प्रेसने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नोटा नवीन डिझाइनसह छापल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु रिझर्व्ह बँकेला या नोटांपैकी केवळ ७२६० दशलक्ष नोटा मिळाल्या. एकूण ५०० रुपयांच्या १७६०.६५ दशलक्ष नोटा गहाळ झाल्या, ज्यांचे मूल्य ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. RBI ची छापखाने बंगळुरू, देवास आणि नाशिक येथे आहेत.

५०० रुपयांची नोट सिस्टीममधून गायब झाल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये आले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मुद्रणालयातील माहितीचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. प्रिंटिंग प्रेसमध्ये ज्या काही नोटा छापल्या जातात, त्या पूर्णपणे सुरक्षित असतात. या बँक नोटांचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण यावर आरबीआय संपूर्ण प्रोटोकॉलसह देखरेख ठेवते आणि यासाठी एक मजबूत यंत्रणा अस्तित्वात आहे, असंही RBI ने सांगितले.

Check Also

अॅक्सिस बँकेतून ही कंपनी बाहेर पडणार नवीन ब्लॉक डिल करण्याच्या विचारात

ॲक्सिस बँकेत मोठ्या धमाकेदार प्रवेशानंतर सहा वर्षांहून अधिक काळ, बेन कॅपिटल खाजगी क्षेत्रातील कर्जदात्यातून पूर्णपणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *