Breaking News

एफडीवर मिळतोय ९ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर या बँकांच्या एफडी फायदेशीर, रेपो दरात कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आयबीआयच्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक आणि इतर बँक ग्राहकांना एफडी ठेवींवर अधिक व्याजदर मिळण्यास अधिक वेळ मिळाला आहे. सध्या, अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना तसेच सामान्य ग्राहकांना एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत. आरबीआयने गेल्या ३ वेळा रेपो दरात बदल न केल्यानंतर अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. यामुळेच अनेक तज्ञ एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम वेळ मानत आहेत. लोक सध्याच्या ठेव दरांवर त्यांची एफडी लॉक करू शकतात. कारण ही गुंतवणूक करण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

अनेक बँका विशेष एफडीवर ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. अनेक स्मॉल फायनान्स बँक ग्राहकांना ९ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. काही नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या एफडीवर ८ टक्क्यांहून अधिक व्याज दर देऊ करत आहेत.

लघु वित्त बँकांचे व्याजदर

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक – 4.50% ते 9.60%

ESAF स्मॉल फायनान्स बँक – 4.50% ते 9.00%

युनिटी स्मॉल फायनान्स बँक – 4.50% ते 9.50%

जन स्मॉल फायनान्स बँक – 4.25% ते 9.00%

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक – 4.00% ते 9.00%

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक – 3.60% ते 9.11%

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक – 3.75% ते 9.25%

उत्तम कालावधी

सध्या बँकांचे एफडी ठेव दर आकर्षक आहेत. तज्ञांच्या मते, आरबीआय पुढील ६-९ महिन्यांनंतर रेपो दरात कपात करू शकते. रेपो दरात कपात झाली तर एफडीच्या दरात आणखी कपात होऊ शकते. अशा परिस्थितीत एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. मुदत ठेवींवर जास्त परतावा मिळवणारे लोक स्मॉल फायनान्स बँकांमध्ये गुंतवणूक करू शकतात. ही बँक निश्चित कालावधीच्या एफडीवर ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्क्यांहून अधिक व्याज देत आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

चालकांच्या आंदोलनासमोर अखेर केंद्राची माघार गृह सचिवांनी दिले आश्वासन

केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या न्यायसंहिता अर्थात क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये बदल करत अपघातानंतर पळून जाणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *