Breaking News

आर्थिक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयकडून राज्यातील ‘या’ बड्या बँकावर कारवाई भाजपाचे माजी मंत्री देशमुख यांची लोकमंगल, आरबीएल आणि रायगड जिल्हा सहकारी बँक व एचएफसी बँकेलाही ठोठावला दंड

आर्थिक वर्ष संपत आल्याने खाजगी, सहकारी तत्वावरील बँकाकडून करण्यात आलेल्या कर्ज वाटप प्रकरणी आणि सादर करण्यात आलेल्या लेखापरिक्षातील खात्यातील आकडेवारीची माहिती आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेला सादर करावी लागते. मात्र रिझर्व्ह बँकेला सादर कऱण्यात आलेल्या लेखा परिक्षण अहवालात ८ सहकारी आणि खाजगी बँकांच्या व्यवहारांमध्ये आयरबीआयने निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

या आठपैकी ४ बँका या मुंबई आणि महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये भाजपाचे माजी मंत्री तथा विद्यमान दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांची लोकमंगल सहकारी बँकेचा समावेश आहे. लोकमंगल सहकारी बँकेने कर्ज वाटप करताना नियमांचे पालन केले नसल्याने ३ लाख रूपयांचा दंड आरबीआयने ठोठावला आहे.

त्यानंतर मुंबईतील रायगड सहकारी बँकेलाही १ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय आरबीएल बँकेला कर्ज वसुली प्रकरणात दाखविण्यात आलेल्या अफरातफरीत ५ कोटी २७ लाख २५ हजा रूपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीला ५ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड राष्ट्रीय हौसिंग बँकींग नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दा दंड ठोठावण्यात आला आहे.

तसेच नोएडा येथील नोबेल सहकारी बँक, मध्य प्रदेशातील रायसेन येथील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत, मुदसर येथील स्मृती नागरीक सहकारी बँक मर्यादीत, पंजाबमधील इम्पीरिअल अर्बन सहकारी बँक लि. आदी बँकावर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडाची कारवाई केली आहे.

आरबीआयने कारवाई केलेल्या आदेशाची प्रत खालीलप्रमाणे….

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *