Breaking News

आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर एसबीआयकडून २०००च्या नोटा बदलण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे जारी फक्त २००० हजारच्या १० नोटा आणा आणि न्या बदलून

नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थात आरबीआयने एक परिपत्रक जारी करत देशातंर्गत बाजारात २००० हजार रूपयांच्या नोटां अवघ्या ६ टक्के इतक्याच असल्याचे स्पष्ट करत. तसेच या नोटा सुरुवातीला ६७ टक्के इतक्या होत्या. मात्र मागील पाच वर्षात नोटांचा वापर बाजारातून कमी झाल्याचे दिसून आल्याने २००० रूपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय जारी केला. या पार्श्वभूमीवर या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत काय पुरावा द्यायचा कि अर्ज भरून द्यायचा अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु होऊन एकप्रकारची संभ्रामवस्था निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर आयआरबीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यानंतर एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने नोटा बदलून घेण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रानुसार ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. २३ मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार असून, स्टेट बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासंदर्भात महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या नोटा एकावेळी २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल, यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी २००० रुपयांच्या १० नोटा बदलून घेऊ शकतात.
तुम्ही एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय २००० रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता. बँकेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, २००० रुपयांच्या दहा नोटा बदलताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील, असे आरबीआयने म्हटले. आता २३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिक २००० रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीच्या प्राईम टाईम या वेळे दरम्यान रात्री ५०० आणि १००० रूपयांची नोटा चलनातून रद्द करण्यात येत असल्याचे जाहिर केले. तसेच ज्यांच्याकडे या नोटा आहेत. त्यांना नोटा बदलून घेण्यासाठी संबधित व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेच्या अर्जासोबत जमा केल्यास त्या व्यक्तीस नोटा बदलून मिळणार होत्या. मात्र यावेळी या नोटा बदलून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही स्वतः घोषणा केली नाही की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही वाच्यता केली नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रूपयांच्या नोटा मागे घेत असल्याचे जाहिर केल्यानंतर या नोटा बदलून देण्यासाठी नागरिकांना कोणता पुरावा द्यायचा किंवा अर्ज भरून द्यायचा आहे का अशी विचारणा करण्यात येऊ लागल्यानंतर रिझर्व्ह बँकेने अशी कोणत्याही अर्जाची किंवा पुरावा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आता एसबीआयनेही तशा मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

Check Also

इन्फोसिस एडीआर न्यूयॉर्क बाजारात ७ टक्क्याने घसरली १५.३० निचांकीस्तरावर

सूचीबद्ध IT फर्मने FY25 साठी १-३ टक्के महसूल वाढीचा अंदाज नि:शब्द स्थिर चलन (CC) जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *