Breaking News

Tag Archives: pm narendra modi

मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाला रोखण्याचा भाग म्हणून जरी लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत असली तरी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची माहिती दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सांगितल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केला. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करायचा कि कडक निर्बंध याप्रश्नी राज्यातील जनतेशी …

Read More »

राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या! लसीकरणासाठी वयाची अट शिथील करण्यासाठी राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा-नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे तरुण बाहेर पडतात त्यामुळे कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात …

Read More »

केंद्राने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावेत व्याजदर कपातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा निशाणा

मुंबई: प्रतिनिधी भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात …

Read More »

कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार? मोदींच्या चुकांची किंमत सात वर्षांपासून देश मोजतच आहे: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. परंतु देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक …

Read More »

पंतप्रधानांनी सांगावे, बांग्लादेश मुक्तीच्यावेळी कधी आणि कोणत्या जेलमध्ये ठेवले? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणत्या पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासियांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे लगावला. बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी आंतरवासिता अर्थात इंटर्नशिप धोरण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्याकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलिकडेच ऑगस्ट २०१६ मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेले उमेदवारांत …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या मागणीला पंतप्रधान मोदींचा सकारात्मक प्रतिसाद कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणेकरून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळावी अशी विनंतीही ठाकरे यांनी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची सूचना लगेचच उचलून …

Read More »

केंद्राने महाराष्ट्राला नाहीतर पाकिस्तानला केला कोरोना लसीचा पुरवठा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आटोक्यात आलेले कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला असताना केंद्र सरकार महाराष्ट्राला कोरोनाच्या लसीकरणासाठी पुरेशा लस मुद्दामहून उपलब्ध करून देत नाही हे दुर्दैवी आहे. दुसरीकडे केंद्र सरकार पाकिस्तानला कोरोना लस पुरवत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी …

Read More »

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा खा. डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजपा नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

शेतकरी, कामगारासह या प्रश्नावरून मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांना ठणकावले नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला महत्वाचा मुद्दा

मुंबई: प्रतिनिधी लहरी पर्यावरणाचा फटका दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बसत असून पीक विमा कंपन्यांच्या नफा आणि नुकसान याचे प्रमाण परत एकदा निश्चित करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत नुकसानग्रस्तांना दिली जाणारी भरपाईची रक्कमही तोकडी असून त्याबाबतीतही  केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे ठणकावून सांगत जवान, जय किसान मग …

Read More »