Breaking News

Tag Archives: pm narendra modi

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु झाला. त्यामुळे आता हे इंजेक्शन बाधित रूग्णांसाठी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी किंमतीवर कॅप लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे आता …

Read More »

निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी; कुपी विकायला केंद्राचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडिसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्र सरकार त्यास नकार देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटर वरून केला. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख …

Read More »

मोदींना, ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस मोदीजी, हजारो चिता जळत आहेत, आता तरी जनतेच्या जिवीतास गांभीर्याने घ्या ! नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खा. राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी …

Read More »

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला पायबंद करण्यासाठी लस निर्मिती आणि संशोधन करण्यासाठी राज्याला परवानगी द्यावी अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. परंतु त्यावेळी केंद्रांतील मोदी सरकारने राज्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तब्बल एक वर्षानंतर सबंध देशभरात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट …

Read More »

कोविडला नैसर्गिक आपत्ती जाहिर करा, कर्ज हप्ते वसुली करू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सिजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी, तसेच बँकांकडून कर्जाची हप्ते वसुली करू नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना …

Read More »

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र प्रसार रोखण्यासाठी केल्या पाच मागण्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येमुळे परिस्थिती बिकट बनत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी वांरवार कडक निर्बंध लादणे कोणत्याही राज्याला परवडणारे नाही. तसेच  राज्यात १०० टक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. आरोग्य हा राज्यांचा विषय असल्याने लसीकरण करण्यासाठी राज्याला लसींची खरेदी करण्यासाठी पुरेसे अधिकार दिल्यास राज्याला कोरोनाचा सामना करणे सोयीचे जाईल असे सांगत …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचारामुळे १३० कोटी जनता रामभरोसे कोरोनाचा देशात उद्रेक असताना पंतप्रधान मोदी मात्र प्रचारसभा घेण्यातच मग्न! : नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडले. पंतप्रधानांना जनतेच्या जीवापेक्षा …

Read More »

लसीकरण केंद्रे बंद असताना कसला ‘लस महोत्सव’ साजरा करता? बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्वाची असताना केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही. लसीअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना …

Read More »

लसच नाही तर मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही मोदी सरकारचा महाराष्ट्रावर अन्याय काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला कमी लस पुरवठ्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कोरोनाच्या लढाईसाठी लागणाऱ्या मेडिकल इक्वीपमेंट देण्यातही केंद्राकडून अन्यात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला दिलेल्या इक्वीपमेंटची माहिती केंद्र सरकारनेच संसदेत दिल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज एका प्रसिध्दी …

Read More »

मुख्यमंत्री पंतप्रधानांना म्हणाले, कोविडमध्ये राजकारण आणू नका अशी समज द्या लसीकरणही करण्याची तयारी मात्र जादा लस पुरवठा, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स उपलब्ध करावेत

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही …

Read More »