Breaking News

Tag Archives: obc reservation

देवेंद्र फडणवीस यांचा टोला, मविआ सरकार नेहमीच उशीरा जागे होते म्हणून… ओबीसी आरक्षणावरून मुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्र्यांना टोला

राज्यात सध्या ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करायचे काम सुरु आहे. ते काम अंत्यत चुकीच्या आणि सदोष पध्दतीने होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर करत आपले सरकार नेहमीच उशीराने जागे होते. म्हणून मी आताच त्यांना जागे करत असल्याचा उपरोधिक …

Read More »

आरक्षण सोडतीनंतर ओबीसी आरक्षणासह सोडतीसाठी पुन्हा बैठक? ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा दबाव कामी- भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार

ओबीसी आरक्षणाशिवाय मुंबई महापालिकेने वॉर्ड आरक्षणे जाहीर केली असली तरी ओबीसी आरक्षण मिळावेच असा रेटा भाजपाने ठेवल्याने आज पालिका आयुक्तांनी पुन्हा याबाबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा ओबीसींच्या न्यायाचा लढा असून आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे मत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासह स्थानिक …

Read More »

चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना ग्रामीण भाषेत बोलण्याचा आनंद झाला तिसरी जागाही निवडूण आणू शकतो

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी …

Read More »

धनंजय मुंडेचे आव्हान, आधी रेशीम बागेतील संघाच्या कार्यकारिणीत ठराव… सर्व जातींना आरक्षण देण्याचा ठराव करा व मग आमच्यावर बोला

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडीवर खूप टीका करण्यात आली. आम्ही आरक्षणाच्या विरोधात असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आज आम्ही या राज्यस्तरीय अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको, या ठरावाचे अभिनंदन सर्वांनी केले. तसाच ठराव रेशीम बागेमध्ये संघाच्या कार्यकारिणीमध्ये या देशातील सर्व जातींना आरक्षण दिले पाहिजे, असा …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, मी ब्राम्हणांच्या नाही पण मनुवादाच्या विरोधात भाजपाचे लोक ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात का गेले? याचे उत्तर द्यावे

भाजपाचे लोक आरक्षण मिळाले नाही म्हणून बोंब ठोकतात आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक कोर्टात जाऊन आरक्षणाला विरोध करतात. मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, पण मी मनुवादाच्या विरोधात आहे, अशी रोखठोक भूमिकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित ओबीसी परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे …

Read More »

शरद पवार म्हणाले, इथे कुणी फुकट काही मागत नाही… जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही

sharad pawar

इथे कुणी फुकट काही मागत नाही. जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ओबीसी अधिवेशनात आज मांडली. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडले. राज्यघटनेने एससी, एसटी समाजाला ज्या सवलती …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान, तिहेरी चाचणी काय ते सांगा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाचा धडक मोर्चा

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा नाना पटोले …

Read More »

नाना पटोले म्हणाले, तर भाजपाची नौटंकी… आरक्षणाप्रश्नी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा -

Nana Patole

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालयावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आणि नौटंकी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजपा सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे, …

Read More »

इम्पिरिकल डेटा जूनच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात सादर मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणासह घेण्याची परवानगी मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिली. त्यातच राज्य निवडणूक आयोगाकडून न्यायालयाच्याच आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली. यापार्श्वभूमीवर काहीही करून ओबीसी आरक्षणासह निवडणूका घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात इंम्पिरियल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

दिलीप वळसे पाटील

ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ओबीसींना आरक्षण मिळायला हवे हाच प्रयत्न सरकारचा आहे अशी स्पष्ट भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली. वाचा ओबीसीशिवाय “या” १४ …

Read More »