Breaking News

Tag Archives: ncp

धनंजय मुंडे यांच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, प्रलंबित प्रस्ताव तातडीने काढणार हरभरा खरेदी केंद्र सुरू करा नाफेडशी चर्चा करून प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढण्यात येतील

एकीकडे पाऊस व गारपिठीने राज्यातील शेतकरी हैराण आहे. गारपीठ व पावसाने आपला हरभरा खराब होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांना तो हरभरा खरेदी केंद्रावर विकायचा आहे. मात्र राज्यात नाफेडद्वारे चालवण्यात येणारी बहुतांश हरभरा खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. नाफेडकडे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठीचे बरेच …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू, याचा लाभ कोणाला? कागदपत्रे सादर करत यामागे कोण याचा खुलासा करण्याची मागणी

हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केला. हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहितीच कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमावरून केला सवाल, सनातन धर्म म्हणजे काय? सनातन धर्माविरोधात ब्राम्हण समाजातील विचारवंतानीच लढा पुकारला

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका करत सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड असून पण सनातन धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. सनातन धर्माने पाच …

Read More »

छगन भुजबळांनी केले उध्दव ठाकरे यांचे कौतुक, सर्वस्व गमावल्यानंतर सुध्दा… दुसरं कोणी असते तर अंथरूण धरलं असतं

साधारणतः आठ महिन्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्ताही स्थापनही केली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर …

Read More »

एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर, आपटी बार, फुसका बारच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नाही… यांच्याकडे फक्त तीनच शब्द खोके, गद्दार आणि विकलेले गेलेले

बाळासाहेब ठाकरेंच्या विचार वाचविण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाविरोधात आम्ही उठाव केला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून तुम्ही बंड केलात. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही खरे गद्दारी केलीत. फक्त आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना वाचविण्याचे काम करत त्यांच्या तावडीतून आणल्याचा प्रत्यारोप मुख्यमंत्री …

Read More »

छगन भुजबळ भावनिक होत म्हणाले, माझा धाकटा भाऊ स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर मी… लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसीसह समाजातील वंचित घटकांसाठी सुरू केलेलं काम शेवटचा श्वास असेपर्यंत सुरू ठेवणार

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील ओबीसीसह पीडित सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी सुरू केल्याल्या कामाची सर्व जबाबदारी आता माझ्यावर आणि तुमच्यावर आहे. त्यामुळे शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांचं काम सुरू ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड या …

Read More »

जयंत पाटील यांचे भाकीत,…तर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय. परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८ जागा भाजपा चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जयंत पाटील आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी …

Read More »

अजित पवारांचा खोचक टोला, ज्या-ज्या वेळी न्यायालयाने ताशेरे ओढले त्या-त्या वेळी… न्यायालयाच्या ताशेऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांच्याऐवजी मंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताच विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणामुळे मंत्रीमंडळातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर न्यायालय ताशेरे ओढते हे महाराष्ट्राच्या गौरवशाली पंरपरेसाठी शोभनीय नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान मांडलेल्या या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कुठेयत विचारताच भाजपा आमदाराने उध्दव ठाकरेंचे नाव घेत… सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगला रंगला वाद

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा संपत आला. मागील तीन आठवड्यात अनेकवेळा विरोधक वेगवेगळ्या विषयावरील प्रस्ताव मांडत असतात मात्र राज्य मंत्रिमंडळातील एकही मंत्री सभागृहात गैरहजर असल्याचे प्रसंग अनेक वेळा घडले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांना सुनावणलेही त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर सभागृहात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत ग्वाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित …

Read More »