Breaking News

Tag Archives: ncp

छगन भुजबळांनी धरले धारेवर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही ; छगन भुजबळ यांच्यासह महाविकास आघाडीचा सभात्याग

राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला, काल पंतप्रधानच बदलले आता ते माझे गटनेता पदही धोक्यात… मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते...

विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त असून या पदावर एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली अशी माहिती देण्यात आली. ही माहिती अजूनही अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात येत आहे ही गंभीर चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …

Read More »

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणाऱ्या कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधातील आंदोलनाला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा? अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट, गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा गगनभेदी …

Read More »

शरद पवारांनी सांगितला किस्सा, चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आईने ‘गावच्या तहसीलदारापेक्षा…’ अझीम प्रेमजी यांनी चव्हाण सेंटरचा सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि सन्मानाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल शरद पवारानी व्यक्त केली कृतज्ञता...

आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जग, जंगल आणि …

Read More »

मुश्रीफांवरील ईडी कारवाईवर प्रफुल पटेल मोजक्या शब्दात म्हणाले, मला माहिती नाही पण मुश्रीफ… प्रफुल पटेल यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार अद्यापही लटकतीच

केद्रांत भाजपाचे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी वरळी येथील एका मालमत्ता खरेदी प्रकरणी ईडीने कारवाई सुरु केली. तसेच या तपासात अद्याप काय सापडले काय नाही याबाबतची माहिती अधिकृतरित्या अद्याप पुढे आली नाही. मात्र त्यांचे पक्षातील सहयोगी तथा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात दिड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई …

Read More »

धनंजय मुंडेंचे बहिण पंकजा मुंडेंना ओपन चँलेंज, मी एमआयडीसी आणली आता तुम्ही… मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही

राज्यातील मुंडे बंधू-भगिनीमधील वाद निवडणूकीच्या तोंडावर सातत्याने उफाळून येत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तर कधी कधी आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा ओलावाही राज्यातील जनतेला पाह्यला मिळाला आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंडे बहिण भावातील संघर्ष पुन्हा एकदा पाह्यला …

Read More »

अजित पवारांचे आव्हान, किमान फडणवीसांनी घोषणा केल्याप्रमाणे तरी करावं… रोज आठ शेतकरी संपवतात जीवन- शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन

राज्यातील कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, असे आश्वासन सरकार सभागृहात देत असले तरी फिल्डवर प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. खरं तर सरकारने कृषी धोरणानुसार वीज थकबाकीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ करायला हवी. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस हीच मागणी करत असत, मग …

Read More »

लोढांच्या लव्ह जिहादवक्तव्यावरून अबु आझमी, गुलाबराव पाटील यांच्यात झुंपली अखेर अजित पवार यांच्या सूचनेनंतर वाद थांबला

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात ८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खास महिला सदस्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत विशेष सत्र बोलविण्यात आले होते. यावेळी राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादबाबत धक्कादायक विधान करत राज्यात लव्ह जिहादची १ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली …

Read More »

खत खरेदीवेळी जातीची विचारणाः विरोधकांनी धारेवर धरताच अखेर सरकारची …. अजित पवार आणि नाना पटोले आक्रमक पवित्रा घेतल्या नंतर मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

आधीच नैसर्गिक संकटांमुळे आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या खताची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नावं नोंदवावी लागतात. मात्र नाव नोंदविताना ऑनलाईन पोर्टलवर संबधित शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याची माहिती पुढे आली. याच याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले असून याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेशः ईडी चौकशीची मागणी करणाऱ्या सोमय्यांचीच चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश

मागील काही वर्षापासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ईडी चौकशीची मागणी करतात आणि या यंत्रणेकडून लगेच चौकशीही सुरु होत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या कारवाई विरोधात …

Read More »