Breaking News

Tag Archives: monsoon session

पावसाळी अधिवेशनः ५० खोके एकदम ओके…., आले रे आले गद्दार आले…. गगणभेदी घोषणांनी विधानभवन दणाणले

शिवसेनेतील शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत स्थानापन्न झाल्यानंतर या सरकारचं हे पहिले पावसाळी अधिवेशन, पायउतार झालेले कालचे सत्ताधारी आणि आजचे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होते. आज त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून क्रिएटिव्ह अशी रचनात्मक घोषणाबाजी केली. ५० खोके… एकदम ओके… या सरकारचं …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला वाटले अजित पवार अभ्यासू आहेत मात्र आता ते… अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरील वक्तव्यावरून केली टीका

आतापर्यत माझा असा समज आहे की अजित पवार हे फार अभ्यासू आहेत. अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नाहीत. तसेच त्यांच्याकडील स्वीय सहायक जो आहे त्यावरून तरी दिसते. मात्र आता ते माझा विश्वास तोडत असल्यासारखे वाटते अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांना त्रास होणार कारण…. शिदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचा त्रास होणार

उद्यापासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला. पण त्यांचे पत्र आम्हाला मिळाले. ते सात-आठ पानाचे आहे. ते पत्र बघताना मला वाटले तो अंतिम आठवडा प्रस्ताव आहे अशी कोपरखळी लगावत. त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला सत्तेवर येवून …

Read More »

अजित पवार म्हणाले, मग आम्ही पण शक्तीमान असल्याचे दाखविण्यासाठी तसं… प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीच्या सवालावर अजित पवारांचे उत्तर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर राज्याचे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर बैठकीत चर्चेची माहिती देण्यासाठी विधिमंडळ भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, एक आमदार कोणाचा कोथळा काढा, हात पाय तोडा अशी भाषा करत आहेत. एक बहाद्दर आमदार …

Read More »

अजित पवार यांच्या ‘त्या’ मागणीने प्रशासनाला प्रश्न, उत्तरांना मान्यता कोण देणार? विधिमंडळाकडून उत्तरे पाठविण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून ३९ दिवस झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आता मंत्रिमंडळ विस्तार होवून तीन दिवस होत आले तरी अद्याप मंत्र्याना खाते वाटप झालेले नाही. त्यातच १७ तारखेपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे न घेण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारने आता प्रश्नोत्तरे घेण्याची …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शिवसेनेने काँग्रेसशी चर्चा करायली हवी होती… शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी २०१९ साली राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर स्थापन करण्यात आले होते. आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असली तरी महाविकास आघाडी म्हणून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल शिवसेनेने काँग्रेस पक्षाशी चर्चा करायला हवी होती. विरोधी पक्षनेते ठरवताना शिवसेनेने काँग्रेसशी …

Read More »

नव्या सरकारचे ९ दिवसांचे पावसाळी अधिवेशन, मात्र ३ दिवस सुट्टीचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

राज्यातील नव्याने स्थानापन्न झालेल्या पण अद्यापही अस्थिरतेच्या भावनेने ग्रासलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथेप्रमाणे नियमित पावसाळी अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठरविण्यासाठी आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत नव्या सरकारचे नऊ दिवसांचे पावसाळी अधिवेशन बोलाविले असून त्यातील तीन दिवस सुट्टीचे राहणार आहेत. सदरचे सन २०२२ …

Read More »

राज्यपालांच्या आदेशानुसार रखडलेले पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सहा दिवस कामकाज होणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्यावरील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेले नियोजित १७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. त्यातच शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची एकमेकांच्या विरोधात सुरु असलेली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुरु आहे. त्यावर अंतिम निकाल …

Read More »

विधिमंडळ अधिवेशन होणारः मंगळवारी उद्याच्या बैठकीत ठरणार तारीख कामकाज सल्लागार समितीची उद्या दुपारी होणार बैठक

राज्यात सत्तांतर होवून जवळपास एक महिना उलटून गेला तरी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचे नियमित पावसाळी अधिवेशन घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात येणार असून त्यासाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती अर्थात बीएसीची बैठक उद्या बोलाविण्यात …

Read More »

अखेर “या” कारणामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले… राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसल्याने विधिमंडळाचा निर्णय

राज्यात सत्तांतर होत बंडखोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. मात्र शिंदे-फडणवीसांचा शपथविधी होवून १५ दिवस उलटले तरी या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे उद्या जावून विधिमंडळ अधिवेशन बोलावले तर विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे कोण जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे …

Read More »