Breaking News

Tag Archives: monsoon session

अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभाध्यक्षच कोरोना पॉझिटीव्ह नाना पटोले यांनी ट्विट करत दिली माहिती

नागपूर-मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, आमदाराचे पीएपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असलेल्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र आता दस्तुरखुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे च कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्या्ंच्या उपस्थितीशिवाय पावसाळी अधिवेशन होणार का? असा प्रश्न …

Read More »

मंत्र्यांसह सर्वांनी आधी कोरोनाचा टेस्ट रिपोर्ट दाखवा मगच विधानभवनात प्रवेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला सविस्तर आढावा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी ५ व ६ …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …

Read More »

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन म्हणजे तारीख पे ताऱीख ७ सप्टेंबरचा आता तिसऱ्यांदा मुहुर्त

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर दाटलेल्या कोरोनाच्या दाट छायेतून सुटका होताना दिसत नाही. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. नियोजीत कार्यक्रमानुसार जून महिन्यात होणारे पावसाळी अधिवेशन बदलत्या परिस्थितीनुसार जुलैमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनामुळे या अधिवेशनाला जुलै नंतर ऑगस्टच्या मुहूर्ताची प्रतिक्षा होती ती देखील आता मावळली …

Read More »

विधान परिषदेचे आमदार म्हणतात, अधिवेशन “झुम” अॅपवर घ्या अंतिम निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातच आता विधिमंडळाच्या पावसाळी  अधिवेशनाचा कालावधी जवळ येत आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन घ्यायचे की नाही यावरून संभ्रम निर्माण झालेला असताना विधान परिषदेतील काही सदस्यांनी झुम अॅपवर विधान परिषदेचे अधिवेशन घेण्याची मागणी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. …

Read More »

हवामान खाते म्हणते चांगला पाऊस पडणार ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा दावा

मुंबईः प्रतिनिधी यावर्षी देशात सरासरी पाऊस होईल. त्याचबरोबर हे प्रमाण ९६ टक्के राहणार असल्याची माहिती राज्य हवामान खात्याकडून शुक्रवारी सांगण्यात आली. “हा पाऊस शेती उत्पादन व आशियातील तिस-या क्रमाकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा असेल. भारतात अर्ध्यापेक्षा अधिक शेती क्षेत्र हे सिंचनाखाली नाही. तसेच सिंचनक्षेत्र निव्वळ पावसावरच अवलंबून आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण …

Read More »