Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला वाटले अजित पवार अभ्यासू आहेत मात्र आता ते… अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरील वक्तव्यावरून केली टीका

आतापर्यत माझा असा समज आहे की अजित पवार हे फार अभ्यासू आहेत. अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नाहीत. तसेच त्यांच्याकडील स्वीय सहायक जो आहे त्यावरून तरी दिसते. मात्र आता ते माझा विश्वास तोडत असल्यासारखे वाटते अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जी मदत जाहिर केली. ती मदत शेतकऱ्यांना नऊ महिन्यानंतर दिली. आम्ही तसे करणार नाही. पुरवणी मागण्या मान्य झाल्या की आम्ही लगेच शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करू. तसे पाह्यला गेले असता आम्हाला पुरवणी मागण्याही मान्य होण्याची वाट पाहण्याची गरज नाही. एसडीआरएफमधून आम्हील २ हजार कोटी रूपये देवू शकतो असेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर राज्यातील सर्वच कामांना आम्ही सरसकट स्थगिती दिली नसून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पुर्नविलोकन करत आहोत. पुर्नविलोकन झाले की ते निर्णय पुन्हा आम्ही लागू करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चहापानावर त्यांनी प्रथेप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. तसेच त्यांनी सात आठ पानाचे पत्रही पाठविले आहे. परंतु त्यातीच ६ ते ७ पाने ही आम्हीच विरोधात असताना लिहिलेल्या पत्रातील आहेत. त्यातील शब्दरचना, वाक्यरचना आमचीच असल्याचे सांगत कदाचित विरोधक अजित पवार विसरलेतर की दिड महिन्यापूर्वी तेच सत्तेत होते ते असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

विरोधकांनी सरकारवर लक्ष ठेवण्यापेक्षा त्यांच्या आघाडीत असलेल्या तीन पक्षाकडे लक्ष द्यावे असा पलटवार करत विरोधकांनी शिंदे सरकारवर विश्वासही दाखविला असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *