Breaking News

Tag Archives: home minister dilip walse-patil

गुप्तचर विभागाचा इशारा, बाहेरचे लोक येवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट पोलिसांच्या बैठकीत गुप्तचर विभागाची माहिती

एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा पोलिस महासंचालकांना फोन, योग्य कारवाई करा गृहमंत्री गिलीप वळसे-पाटील यांनी बैठक घेतल्यानंतरची मोठी घडामोड

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस उच्च अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी फोनद्वारे चर्चा …

Read More »

गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, संपूर्ण सरकार… कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण;शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान

गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतु संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील यांची घोषणा, लकडावालाकडून घेतलेल्या कर्जाची चौकशी ईओडब्लू कडून चौकशी होणार

हनुमान चालिसावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी शिवसेनेसह थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे त्यांना दोन गटात तणाव निर्माण केल्याप्रकरणी आणि शासकिय यंत्रणांना आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवित त्यांना तुंरुगात रवानगी केली. त्यानंतरही नवनीत राणा यांनी थेट लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवित …

Read More »

भोंग्यांबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार की नाही हे सांगा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा आघाडी सरकारला सवाल

प्रार्थनास्थळांवरील बेकायदा ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणार की नाही, याचे उत्तर आघाडी सरकारने द्यावे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, राज पुरोहित, मुंबई सरचिटणीस संजय …

Read More »

राणांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही; लोकसभाध्यक्षांना राज्य सरकार माहिती देईल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

अटक करण्यात आल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही तसेच पिण्यासाठी पाणी दिले नसल्याचा आरोप करत आपणास जातीवाचक शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केला. तसेच यासंदर्भात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रारही केली. मात्र मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी …

Read More »

अजित पवार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते हे लक्षात घ्या तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, सर्वांना समान संधी

महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो, सर्वसामान्य नागरिकांना किंमत मोजावी लागते, हे लक्षात घेऊन राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री …

Read More »

गृहमंत्री वळसे म्हणाले की, भोंग्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा तर केंद्रानेच धोरण ठरवावे सर्वपक्षिय बैठकीनंतर दिली पत्रकार परिषदेत माहिती

भोंग्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली आदेश काढल्याने हा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात लागू झाल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगत राज्य सरकार यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नसून सध्या ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात ते कायम राहणार आहे असल्याचेही स्पष्ट केले. मशिदींवरील …

Read More »

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, सर्व राजकिय पक्षांच्या बैठकीनंतर भोंग्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती

दिलीप वळसे पाटील

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भोंग्याच्या संदर्भात नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका मांडताना म्हणाले की, भोंग्याप्रश्नी राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांची एक बैठक घेण्यात येणार आहे. त्या बैठकीत त्या विषयीची मते जाणून …

Read More »

भोंग्याच्या संदर्भात लवकरच धोरण, अधिसूचना जारी होणार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मौलवी आणि राज्य सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर राज्य सरकारकडून या संदर्भात धोरण तयार कऱण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु करण्यात आले आहे. यासंदर्भात लवकरच पोलिस दलातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याच्या संदर्भात पोलीस महासंचालक आणि मुंबई …

Read More »