Breaking News

Tag Archives: corona virus

पगार कापून बिले आलीत, पण मुख्यमंत्रीसाहेब पोलिसांना पुर्ण पगार द्या भाजप नेते आमदार अँड. आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या लढाईत महत्त्वाचे काम करणाऱ्या पोलिसांचे पगार कपात केली जाणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने जाहीरपणे दिली. तरी अद्याप पोलीसांचे पगार झालेले नाहीत. मात्र ट्रेजरीकडे आलेली पे बिल २५% कपात करुन आल्याने पगार कपात करून जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे पोलिसांना पुर्ण पगार द्या, …

Read More »

पर्वत आणायला गेल्यासारखे जाऊ नका, नाहीतर पोलिसरूपी हनुमान घेवून जातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवलं पाहिजे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदीआदेश जारी केले आहेत. तरीही लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने जसा औषधी झाडासह पर्वत आणला तसे आणण्यासाठी बाहेर पडला तसे बाहेर पडू …

Read More »

शरद पवारांकडून पहिल्यांदाच भक्तांच्या आयटी सेलचा उल्लेख व्हॉट्सअँपच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करण्याचे आयोजन आहे का?

मुंबई: प्रतिनिधी आज सर्व सामाजिक स्तरावर, जात, धर्म या सर्वांनी एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत कटूता वाढेल, गैरसमज होतील, संशय वाढेल ही स्थिती येवू देता कामा नये. टेलिव्हिजनवर बघतो, त्याहीपेक्षा व्हॉटसअप वरुन जे काही मेसेज येतात ते मेसेज थोडेसे काळजी करणारे आहेत. काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात …

Read More »

संशयित रूग्णांनो लपून राहू नका…अन्यथा आम्हाला कळवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

 मुंबई : प्रतिनिधी कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित …

Read More »

तिसऱ्या टप्प्यात प्रवेश, लॉकडाऊन वाढणार ? मे-जून पर्यत वाढण्याची शक्यता

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात आधी राज्य सरकारने महाराष्ट्र लॉकडाऊन जाहीर केले. मात्र सुशिक्षत असूनही अडाणी व्यक्तीसारख्या वागणाऱ्या नागरिकांमुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून आपण आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे या आजाराचा आणखी प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

दोनच आव्हानं, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं सर्वांच्या सहकार्याने मात करणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे …

Read More »

२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत. पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात …

Read More »

लाईट बंद … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची ग्रामीण परिस्थितीवरील कथा

रम्या गावातला झोलर माणूस. याचे पैसे त्याचाकडून, त्याचे पैसे याच्याकडून आणि जिकडून पैसे काढता येतील तिकडून काढायचा पक्का धंदेवाईक माणूस. त्याची गुजरातची नोकरी सुटल्यावर सरळ गावाला येऊन त्याने किराणा मालाच दुकान टाकलं होतं. नेरेंद्र्भाई त्याच्यासाठी देव माणूस जणू काही याचा जन्म नरेंद्रभाईच्या जांगेतूनच झाला असावा. रम्याने स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी गावापासून …

Read More »

आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत चाचणीचे दर निश्चित करा भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी खाजगी दवाखाने व रुग्णालयात साधा ताप, खोकला अशा रुग्णांना उपचार करण्यात येत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून खाजगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करा, कोरोना चाचणी आरोग्य विम्यातून करण्याची परवानगी द्या, राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा (Disaster Management Act) लागू करा, अशी मागणी भाजपा नेते अँड.आशिष शेलार यांनी …

Read More »

राज्यातील न्यायालयांचे कामकाज आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायालयातही सुविधा राबविण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यायालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायासह राज्यातील सर्व न्यायालयांचे कामकाज व्हिडीओ काँन्फरन्सिंगद्वारा चालविण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील सुविधा राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची …

Read More »