Breaking News

Tag Archives: corona virus

अडीच हजार पथकांनी केले सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२ पथके, पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४१३, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये २१० पथके कार्यरत तर  राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत …

Read More »

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे दुर्दैवानं मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला …

Read More »

कोरोना प्रतिबंधक वस्तूंवरील GST माफ करा आणि लढ्याला बळ द्या उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘३ प्लाय मास्क’, ‘एन 95- मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्‌’,  ‘व्हेन्टीलेटर्स’ तसेच अन्य वैद्यकीय वस्तू, उपकरणांना वस्तू व सेवाकरातून (GST) सूट देण्याची अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केली. हा …

Read More »

अजित पवार म्हणाले, कोरोना पासूनच्या बचावासाठी फक्त दोनच उपाय स्वेच्छेनं क्वारंटाईन होवून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचविण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्‌’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्‌’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्‌’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. ‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजी बाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा …

Read More »

परिस्थिती पाहूनच १५ एप्रिलनंतर लॉकडाऊन टप्याटप्याने शिथिल करा मुख्यमंत्र्यांच्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संर्व राज्यांनी लॉकडाऊन केले. तर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिल २०२० रोजी संपत असली तरी त्या त्या राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन एकदम न उठवता ती टप्याटप्याने शिथिल करावी अशी सूचना करत राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचनेची पंतप्रधान मोदींकडून तात्काळ अंमलबजावणी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकी दरम्यान आवाहन

मुंबई: प्रतिनिधी सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाणे गरजेचे असून तसे आवाहन सर्व धर्मगुरूंना करणे आवश्यक असल्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. या सूचनेची तात्काळ दखल घेत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी यानुसार सर्व …

Read More »

वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांना हलविण्यात यश पोद्दार हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवले

मुंबई: प्रतिनिधी शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून युध्दपातळीवर प्रयत्न करत असतानाच मुंबईतील ऐन मध्यवर्तीभागातील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे १० रूग्ण सापडले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाला मोठ्या मेहनतीने यश आले. वरळी कोळीवड्यात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच या …

Read More »

आमदारानेच बांधली मशीन पाठीवर, अन् केली निर्जंतुकीकरणाची फवारणी जनतेच्या सुरक्षेसाठी पारनेरचे आमदार निलेश लंके उतरले रस्त्यावर

अहमदनगर: प्रतिनिधी जनतेला निव्वळ सूचना न करता ज्या जनतेने आपल्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवला त्या जनतेचं उत्तरदायित्व फेडण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आपल्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले. जनतेच्या सुरक्षेसाठी स्वत: पाठीवर मशीन बांधून निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यास सुरुवात केली. कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे हीच भावना …

Read More »

कंपनी, दुकान मालकांनो कर्मचाऱ्यांचे पगार कापाल तर तुरूंगात जाल राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. याकालावधीत अनेक कामगारांना घरीच थांबावे लागत आहे. त्यामुळे या कालावधीतील कंपन्यांमध्ये असलेले कंत्राटी कर्मचारी, विस्थापित-बेघर कर्मचारी, आऊटसोर्सिंग करण्यात आलेल्या कर्मचाऱी आणि खाजगी दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापल्यास संबधित मालक, कंपनीच्या प्रमुखावर कायदेशीर कारवाई करून एक ते दोन वर्षाची …

Read More »

शेतकऱ्यांसाठी खुषखबर: दररोज १० लाख लिटर दूधाची खरेदी २५ रुपये दराने करणार असल्याची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरु होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात …

Read More »