Breaking News

Tag Archives: corona virus

मुख्यमंत्र्यांसह आमदार ते सरपंचापर्यंतच्या सर्वांना फक्त ४० टक्के वेतन तर सरकारी कर्मचाऱ्यांचे २५ ते ५० टक्के वेतन कपात करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ लॉकडाऊनची लक्षणे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दिसण्यास सुरुवात झाली असून याचा परिणाम म्हणून मुंख्यमंत्र्यांसह, आमदार, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यापासून ते सरपंचापर्यंत मिळणाऱ्या वेतनात ६० टक्के तर राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ ते ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. …

Read More »

मंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो… इस्लामपूरच्या 'त्या' परिसराचा घेतला आढावा

सांगली: प्रतिनिधी आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे असे सांगत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना बाधित इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली. इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्याने सांगलीचे पालकत्व स्वीकारलेल्या जयंत पाटील यांनी न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळण्यास …

Read More »

बंदिस्त… कलावंत आणि सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची लघुकथा

खिडकी समोर एक  कावळा आजकाल नेहमी  ओरडतो. मी ही त्याचं  ओरडणं हल्ली  हल्ली ऐकायला लागलो. त्याला  एक  दोन  वेळा पाहिलं होतं, पण तो हल्ली  थोडा उजळ  दिसू  लागलाय. माणसं घरात बंद झाल्यापासून तो  आता डेरिंग  करून  खिडकी पाशी सहज  येऊन  बसतो. तो आता पाणी  आणि  खायला  धमकी  दिल्यासारखा मागू लागतो. …

Read More »

खुषखबर : राज्यातील घरगुती आणि उद्योगासाठीची वीज स्वस्त घरगुती वीज ५ ते ७ आणि उद्योग १० ते १२ टक्क्याने स्वस्त -राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती हाताबाहेर चालल्याने विद्यमान परिस्थीती आणि भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य नियामक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी घरगुती वीज दरात ५ ते ७ टक्के आणि उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्के वीज दर कपात केल्याची माहिती …

Read More »

कोरोना लॉकडाऊनमध्ये मुंबईतल्या १० लाख झोपडीधारकांसाठी हवेचे इमले पहिल्याच आठवड्यात बंगल्यातील बैठकीत मंत्र्यांनी घेतला निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकारने १५ मार्चपासून लॉकडाऊन करण्याची तयारी सुरु केली. तसेच यासंदर्भात १९ मार्चला अधिकृत आदेशही जारी केले. मात्र विकासकांचे कैवारी म्हणून वावरत असलेल्या एका मंत्र्याने मुंबईतील झोपडपट्टीवासियांसाठी फक्त हवेतल्या इमल्यांची तर विकासकांना दिर्घकालीन मलिद्याची व्यवस्था करणारा निर्णय २० मार्च …

Read More »

आक्रोशाची टाळी, तृतीय पंथीयांना कोणी देईल का भाजी पोळी ? स्नेहालय संस्थेकडून देणगीसाठी आवाहन

 अहमदनगर, दिनांक ३० मार्च २०२०: कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी  सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी  समुदायाचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीसमुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे  भीक  मागून खाण्याशिवाय पर्याय नाही. …

Read More »

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …

Read More »

राज्याचे मुख्य सचिव मेहतांना तीन महिन्यांची मुदतवाढ मुदतवाढीस केंद्राची मान्यता

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटाने सगळ्यांना ग्रासलेले असल्याने आहे. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे प्रशासन काम करत आहे. या आपातकालीन परिस्थितीमुळे त्यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली असल्याने आता मेहता हे ३० जून २०२० रोजी निवृत्त होतील. मुख्य सचिव …

Read More »

स्थलांतर थांबवा, राज्यपाल कोश्यारी यांचे आदेश राज्यपालांनी केली सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला हातावर पोट असणाऱ्या कामगारांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपापल्या मुळ गावी जाण्यास सुरुवात केली. मात्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या कामगारांनी मिळेल त्या वाहनाने, पायी चालत आपले गाव गाठण्यास सुरुवात केली. परंतु अशा पायी जाणाऱ्यांच्या …

Read More »

शासन, महापालिकांच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी वाहनाची सोय करा सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्याच भागात बंद झाल्याने राज्य सरकार आणि महापालिकांच्या  अखत्यारीत असलेल्या रूग्णालयात कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयात पोहोचणे जिकरीचे होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना वेळेवर आणण्यासाठी …

Read More »