Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

मुख्यमंत्री म्हणाले, मला अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क काढायचेत १४ तारखेच्या जाहिर सभेत बोलणार

आता आपण मास्क काढून माईकवर बोलायला लागलो आहोत. मनात भरपूर बोलायचं आहे. बरच साचलंय नव्हे मला मनातलं मोकळं ढाकळं बोलायचे आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर असलेले मास्क काढायचे आहेत असा सूचक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांचे नाव न घेता दिला. मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या अभियानाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. …

Read More »

भाजपा आमदार शेलारांच्या आरोपांना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले “हे” उत्तर फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार घेण्यात आला निर्णय

नुकतेच वांद्रे येथील बॅण्डस्टॅड येथील मोक्याचा भूखंड राज्य सरकारने नाममात्र किंमतीला एखा खाजगी विकासकाच्या घशात घातल्याचा आरोप भाजपा आमदार आशिष शेलार यांनी करत यात राज्य सरकारला झालेल्या नुकसानीची आकडेवारीही दिली होती. शेलार यांच्या आरोपाची दखल राज्य सरकारने गंभीरपणे घेतले असून शेलार यांच्या आरोपाला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तरपणे दिले आहे. …

Read More »

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आमदार रवि राणांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा १५ वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचं आठवलं

हनुमान चालिसावरू मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान दिल्याप्रकरणी तब्बल १२ दिवस तुरुंगात घालविल्यानंतर बाहेर आलेले अमरावतीचे आमदार रवि राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला. १५ वर्षानंतर यांना मी रहात असलेली इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याची टीका आमदार रवि राणा यांनी करत आता मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी सांगितली, शाहु महाराज आणि प्रबोधनकारांच्या ऋणानुबंधाची आठवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रम

प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो. आजोबांनी त्यांची जीवनगाथा लिहिली त्यात हे नातं नमूद केलं आहे. आज देखील शाहू महाराज कोल्हापूरात आहेत असं वाटतं. ते आपल्यातून जाऊन १०० वर्षे झाली हे जाणवत नाही. हा महामानव होता. शाहू महाराजांची केवळ २८ वर्षाची कारकीर्द. ४८ व्या वर्षी …

Read More »

मुख्यमंत्र्याबरोबरील बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ म्हणाले, राज्यात निवडणूका… पंतप्रधान यांनी लक्ष घालून ओबीसींचा प्रश्न सोडवावा- छगन भुजबळ

महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नाही, महाविकास आघाडी ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. असे मत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक ही वर्षा या निवासस्थानी पार पडली. यावेळी महाविकास …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करा महाराष्ट्राची माफी मागावी-भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा याचा सहभाग असल्याचा व त्यासाठी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात गप्प न राहता वाझेची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान …

Read More »

शेलारांचा आरोप, मंत्रालयातील सहाव्या मजल्याचा आर्शिवाद, १ हजार कोटींचा घोटाळा बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात

वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड या उच्चभ्रू वस्तीत ताज हॉटेलच्या शेजारी समुद्र किनारी मोक्याच्या ठिकाणी असणारा १ एकर ५ गुंठे एवढा मोठा शासकीय मालकीचा भूखंड रूस्तमजी ब्लिल्डराला कवडीमोल किमतीत विकण्यात आला आहे. या व्यवहाराला मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरुन कुणाचे आर्शिवाद आहेत, असा सवाल करीत हा १ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजपा …

Read More »

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास विभाग यांचा सहभाग घेण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात उद्योग विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री श्री. …

Read More »

संजय राऊतांचा तो व्हिडिओ मनसे आमदार राजू पाटील यांनी केला शेअर उध्दव ठाकरेंऐवजी मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांचे नाव राऊतांनी घेतले

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यातील घनिष्ठ संबधाची माहिती महाराष्ट्रासह दिल्लीतील वर्तुळात चांगलीच माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत हे दिल्लीत किंवा मुंबईत असतील शरद पवारांची भेट घेतातच घेतात. त्यामुळे अनेकवेळा पवारांसोबत झालेल्या बैठकीची माहिती राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून मनसे …

Read More »

गुप्तचर विभागाचा इशारा, बाहेरचे लोक येवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट पोलिसांच्या बैठकीत गुप्तचर विभागाची माहिती

एकाबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदींवरील भोंग्याचा विषय लावून धरला असतानाच आणि त्यासाठी ४ मे चा अल्टीमेटम दिलेला असताना यापार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातील लोक येवून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला दिली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी …

Read More »