Breaking News

Tag Archives: cbi

समीर वानखेडे यांना पुन्हा न्यायालयाचा दिलासा, मात्र ‘या’ अटींवर पुढील सुनावणी ८ जूनला होणार

कार्डीलिया क्रुजवरील कारवाई दरम्यान सिने अभिनेता शाहरूख खान याच्या मुलगा आर्यन खान याच्यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई केली. मात्र या आर्यन खान याला बाहेर सोडण्यासाठी शाहरूख खानकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याप्रकरणाची ठपका एनसीबीने वानखेडे यांच्यावर ठेवला. त्यानंतर भ्रष्टाचारप्रकरणी ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल …

Read More »

आर्यन खान अटकेनंतर समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यातील व्हॉट्सअॅप संभाषण… समीर वानखेडे यांने मुंबई उच्च न्यायालयात केले दाखल

सीबीआयने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर वानखेडेंवर अटकेची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा आणि अंतरिम संरक्षण मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यात शाहरूख खान आणि समीर …

Read More »

समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा अटकेपासून तात्पुरता दिलासा

सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना तात्पुरता दिलासा देत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं. यानंतर समीर वानखेडेंनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. यात वानखेडेंनी सीबीआयविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं मत व्यक्त केलं. मात्र, काही घाण अधिकारी आहेत आणि ते माझ्यावर घाण आरोप करत असल्याचा आरोप समीर वानखेडेंनी केला. तसेच …

Read More »

समीर वानखेडे यांच्याशी संबधित ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी वानखेडेच्या विरोधात गुन्हा दाखल

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशीसंबंधी मोठी बातमी समोर येत आहे. आर्थिक अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरावर छापेमारी केली आहे. तसेच, सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा …

Read More »

सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप नेमके काय ? वाचा भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता काय परिस्थिती

द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी २०१९ मधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा दावा केला होता. जवानांच्या सुरक्षेमधील कथित त्रुटींबाबत मी बोलू नये, शांत राहावे; असे मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले …

Read More »

राज्यपाल आणि तपास यंत्रणांच्या विरोधात देशभरातील नऊ पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर होतोय

भाजपाची सत्ता नसलेल्या आणि भाजपाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच वर्षभरापासून तपास करून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्यासाठी सुरुवातीला आयकर खात्याकडून नंतर ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा …

Read More »

वंचितप्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान मोदी काहीच चुकीचे वागत नाहीत उध्दव ठाकरे यांच्याशी युती केल्यानंतरही मोदींचे समर्थन

एकाबाजूला वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकत्र येत असल्याचे जाहिर करत नुकतीच वंचित आणि शिवसेनेने युती केली. या युतीच्या घोषणेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे …

Read More »

जयराम रमेश म्हणाले, मोदी सरकार के दो भाई, ईडी और सीबीआय

भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत आहे. या मार्गाबद्दलही काही शंका व्यक्त केल्या जात आहेत पण देशाची दोन ध्रुव जोडणारा हा मार्ग आहे. ही पदयात्रा गंगा नदीसारखी मुख्य यात्रा असून उपनद्यांप्रमाणे ओडीशा, त्रिपुरा राज्यात पदयात्रा सुरु आहेत. पश्चिम बंगाल व इतर राज्यातही अशाच पद्धतीने ‘भारत जोडो यात्रा …

Read More »

काँग्रेसची मागणी, आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी करा गुवाहाटीला जाण्यासाठी कोणी किती खोके घेतले हे जनतेसमोर आले पाहिजे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, आम्ही घाबरत नाही… सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात

देशात सध्या भितीचे वातावरण आहे आणि या देशातील भीतीच्या वातावरणाच्या विरोधात लढण्यासाठी लोक तयार आहेत आणि ते सर्वजण पवार साहेबांकडे आशेने पाहत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा विडा फक्त शरद पवारच उचलू शकतात असा विश्वास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीत व्यक्त केला. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »