Breaking News

समीर वानखेडे यांना पुन्हा न्यायालयाचा दिलासा, मात्र ‘या’ अटींवर पुढील सुनावणी ८ जूनला होणार

कार्डीलिया क्रुजवरील कारवाई दरम्यान सिने अभिनेता शाहरूख खान याच्या मुलगा आर्यन खान याच्यावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कारवाई केली. मात्र या आर्यन खान याला बाहेर सोडण्यासाठी शाहरूख खानकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याप्रकरणाची ठपका एनसीबीने वानखेडे यांच्यावर ठेवला. त्यानंतर भ्रष्टाचारप्रकरणी ‘एनसीबी’चे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला. याविरोधात समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाने २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. मात्र त्याची मुदत आज संपत असल्याने समीर वानखेडे यांनी पुन्हा एकदा आज उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने समीर वानखेडेंना अटकेपासून दिलासा दिला. याप्रकरणी आता ८ जूनला सुनावणी होणार आहे.

समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेण्यात आले होते.

 

त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. तपासानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

सोमवारी आज उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पार पडली. तेव्हा न्यायालयाने समीर वानखेडे यांना काही अटींवर ८ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

यावेळी उच्च न्यायालयाने सुणावनीवेळी समीर वानखेडे यांना निर्देश दिले की, प्रकरणाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध करून देऊ नये. अन्यथा सीबीआयने कारवाई करावी, तसेच तपासात सहकार्य आणि पुरव्यांशी छेडछाड करणार नाही. त्यावर समीर वानखेडे यांनीही तपासाशी संबंधित पुरावे माध्यमांना उपलब्ध न करून देणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयात दिली.

Check Also

हायजॅक केलेल्या जहाजाची अरबी समुद्रात भारतीय कमांडोंनी केली मुक्तता

डिसेंबर महिन्यात सोमालिया जवळ केलेल्या एका भारतीय मालवाहू पण माल्टा ध्वज लावलेले भारतीय मालकीच्या जहाजाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *