Breaking News

Tag Archives: balasaheb thorat

अर्थसंकल्पात पाणी पुरवठा खाजगीकरण, मोफत वीज, रेडिरेकनर दर कपातीचे संकेत ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीतील आप सरकारच्या धर्तीवर राज्यातील जनतेलाही मोफत पायाभूत सुविधा पुरविण्याचे संकेत यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर करण्यात येणार असून या अर्थसंकल्पातून राज्यातील १० महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील सत्तेची केंद्रे पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका …

Read More »

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची मराठी केविलवाणी नाहीच “इये मराठीचिये नगरी” कार्यक्रमातून विधानमंडळात “मराठीचा गजर”

मुंबई: प्रतिनिधी मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची, या टापांचा आवाज खणखणीत तर  मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वास व्यक्त केला. राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने …

Read More »

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले, आमदारांनो सभागृहात रोज हजर रहा महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीत आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, दोन्ही सभागृहाचे कामकाज आज लवकर संपले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दररोज सभागृहात हजर रहा असे आदेश दिले. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा …

Read More »

महसूल विभागाच्या मनमानीला गृहनिर्माणने लावले वेसण अप्पर मुख्य सचिवांच्या समितीच्या मंजूरीनेच होणार प्रतिनियुक्ती

मुंबईः विशेष प्रतिनिधी शहरातील झोपडपट्टीवासियांची पात्रता निश्चित करण्यासाठी प्रतिनियुक्तीवर नेमण्यात येत असलेल्या महसूली अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला गृहनिर्माण विभागाने चांगलीच वेसण लावली आहे. त्यामुळे आता गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजूरी आणि संबधिताची माहिती घेतल्याशिवाय प्रतिनियुक्ती न करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. शासकिय जमिनीवरील झोपडपट्ट्या आणि त्यात राहणारे रहिवाशी …

Read More »

पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बांळासाहेब थोरात यांची भीती

मुंबईः प्रतिनिधी एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे …

Read More »

महाविकास आघाडीकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर भाजपाची तिसरी जागा धोक्यात आणण्यासाठी आघाडीकडून दोन जण उतरणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यसभेवरील राज्यातील सात खासदारांची मुदत संपत आहे. या ७ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. तर ५ वा उमेदवार महाविकास आघाडीकडून संयुक्तरित्या उभा करण्यात येणार आहे. मात्र भाजपाकडून आतापर्यंत फक्त दोनच जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद …

Read More »

मोफत वीज द्यायचीय, पण ४० हजार कोटी कसे जमा करायचे? ऊर्जा विभागासमोर मोठा प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील १०० युनिटपर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज मोफत देण्याची घोषणा ऊर्जा मंत्री नितीन राऊत केली. मात्र या मोफत वीजेपोटी वीज महावितरण पर्यायी राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणाऱ्या ४० हजार कोटी रूपयांच्या आर्थिक बोज्याचे वसुली कशी करायची असा प्रश्न ऊर्जा विभागाला पडल्याची माहिती वीज महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. …

Read More »

घरांच्या किंमतींसाठी रेडी रेकनर दराबाबत लवकरच निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी बांधकाम व्यवसायावर मंदीचे सावट आणि राज्यातील घरांच्या किंमती आटोक्यात राखण्याच्या अनुषंगाने रेडीरेकनरच्या दराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासोबत थोरात यांनी दिली. राज्यातील बांधकाम व्यावसायिक आणि नागरीकांकडून मागणी केल्यास रेडीरेकनरच्या दरात वाढ किंवा घट करता येवू शकते. मात्र गेल्या दोन वर्षापासून रेडिरेकनरच्या दरात वाढ करण्यात आली …

Read More »

हेगडेंच्या त्या वक्तव्यप्रकरणी भाजपा नेत्यांनीच माफी मागावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपा व संघ परिवाराकडून महात्मा गांधींबद्दल वारंवार अशी अपमानजनक वक्तवे केली जात असताना त्यांना भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व पाठीशीच घालत असल्याचे दिसते. हेगडेंचे आजचे वक्तव्यही संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या वक्तव्यप्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच माफी …

Read More »

शाह-जी व्हिडीओवरून महाराष्ट्रात रणकंदन शिवसेना, छत्रपतींच्या वंशजाच्या नाराजीनंतर भाजपकडून खुलासा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याप्रकरणीचा वाद नुकताच क्षमला. तोच दिल्ली निवडणूकीच्या निमित्ताने तान्हाजी चित्रपटाच्या ट्रेलरचा वापर करत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीं आणि अमित शाह यांच्या फोटोचा वापर छत्रपती शिवाजी आणि तान्हाजी स्वरूपात केल्याने केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. …

Read More »