Breaking News

व्याज, भाडे, डिव्हीडंड आणि फर्मच्या नफ्यातल्या हिश्श्याच्या बळावर आदित्यने कमावले ११ कोटी ११ कोटी रूपयांची मालमत्ता असल्याची आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना आज गुरूवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी व्याज, जागा-जमिनीचे भाडे, डिव्हीडंड आणि एका फर्मच्या नफ्यातील मिळणाऱ्या हिश्शातून ८ कोटी रूपये कमाविल्याची माहिती त्यांनी दिली.
आदित्य ठाकरे यांचे शिक्षण बँचलर ऑफ लॉ अर्थात वकिली व्यवसायातील पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या उत्पन्न आणि मालमत्तेच्या माहिती पत्रकात उत्पन्नाचे साधन त्यांनी व्यवसाय दाखविला आहे. मात्र ते नेमका कशाचा व्यवसाय करतात याची माहिती दिली नाही. तसेच त्यांच्याकडे व्याज, भाडे, डिव्हीडंड, फर्ममधील नफ्यातून मिळणारा हिस्सा यातून ११ कोटी मिळविल्याची माहिती त्यांनी नमूद केली आहे.
यापैकी कल्याण आणि घोडबंदर येथील व्यावसायिक इमारतीतील दुकाने त्यांच्या आईकडून बक्षीस स्वरूपात मिळाली आहे. तर वडील उध्दव ठाकरे यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील बिलवणे येथील ७७ लाख ६६ हजार रूपये किंमतीच्या पाच मोठ्या जमिनी त्यांना बक्षिस स्वरूपात मिळाल्या आहेत. आई आणि वडीलांकडून एकूण १ कोटी ६७ लाख ६ हजार९१४ कोटी रूपयांची मिळाली आहे. तर त्यांनी स्वतःला मिळणाऱ्या उत्पन्नातून ३ कोटी रूपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले.
आदित्य ठाकरे यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार०७४ रूपये किंमतीचे सोन्याचे दागदागिणे, हिरे आहेत. बीएमडब्लू कंपनीची ६ लाख ५० हजार रूपयाचे चारचाकी वाहन त्यांच्या मालकीचे आहे. २० लाख ३९ हजार ०१२ रूपये त्यानी बाँण्डस् , शेअर, विविध कंपन्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड आदीमध्ये गुंतवलेले आहेत. तर विविध बँक खात्यांमध्ये १० कोटी ३६ लाख १५ हजार २१८ कोटी रूपयांची रक्कम ठेव म्हणून ठेवल्याचे माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली.
तर हातातच १३ हजार ३४४ हजाराची रोकड असल्याचे त्यांनी नमूद केले असून तसेच १० लाख रूपयांचे अतिरिक्त उत्पन्नही कमावत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

(आदित्य ठाकरे यांचे प्रतिज्ञा पत्र पाहण्यासाठी क्लिक करा aditya affidevet )

Check Also

ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *