Breaking News

अखेर अनेकांची पुजा-अर्चा काही भारतीय क्रिकेट संघाच्या कामी आली नाही

भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून गुजरात येथील क्रिकेट विश्वचषक कप अंतर्गत अंतिम भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या अंत्यत चुरशीच्या लढतीत यजमान भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवित जगात क्रिकेटमध्ये जगजेत्ता कोणी असेल तर ऑस्ट्रेलिया हाच हे या सामन्याच्या निमित्ताने सिध्द करून दाखविले. दरम्यान, विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला विजय मिळावा म्हणून सकाळपासून काही भारतीयांना आपापल्या देवतांची पूजा करण्यास सुरुवात केली. आणि संघाच्या विजयासाठी आर्शिवाद मागितला. परंतु या देवतांची पुजा करणं काही भारतीय क्रिकेट संघासाठी उपयुक्त ठरलं नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्लेस आदींनी या अंतिम समान्यासाठी खास उपस्थिती लावली होती. देशाच्या पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती भारताचा पराभव होणं हे तमाम भारतीयांच्या चांगलेच जिव्हारी लागले.

सामन्यांच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलदांजासमोर भारताने फलंदाजी करत ५० ओव्हरमध्ये चार बाद २४० इतक्या कमी धावांचे आव्हान उभे केले. परंतु ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला भारतीय फलंदाजांना जास्त रन उभारण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला फारशी धावसंख्येचे आव्हान उभे करता आले नाही.

जेव्हा भारतीय क्रिकेट संघावर गोलंदाजी करण्याची पाळी आली मोहम्मद शामी, बुमराह, आणि श्रेयस अय्यर आदीं बॉलर्सने आपपाल्या परीने ऑस्ट्रेलियन संघाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे ट्रॅविस हेड (Travis Head) याने १३७ रनांची धावसंख्या उभारून ऑस्ट्रेलियन संघाला विजयाच्या जवळपास नेले. डेव्हिड वॉर्नर, ट्रॅविस हेड, मिच मार्च (Mitch Marsh), स्टीव्ह स्मिथ आदींची विकेट काढण्यास भारतीयांना यश आले. तरीही त्यानंतर आलेल्या मारनूस लाबूसचेंज (Marnus Labuschagne) , ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ही जोडी शेवटपर्यंत नाबाद राहत ४३ ओव्हरमध्ये २४१ धावा सहज करत भारताने उभे केलेले आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने सहज मोडीत काढले.

दरम्यान, भारतीय गोलंदाज मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, विराज कोहली, शुभम गील, जसप्रीत बुमराह यांच्या आपल्या गोलदांजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ नेणाऱ्या चार जणांची विकेट काढली. त्यामुळे या गोलंदाजांच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाचा होणारा मानहानीकारक पराभव काहीसा टळला असेच म्हणावे लागेल. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांने टीमचे नेतृत्व शांत आणि संयमाने करत भारताला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचविले. शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहली याला काही या समान्यात सूर गवसला नसल्याने अखेर त्याला ५० धावाच काढता आल्या.

या सामन्यासाठी भारतरत्न सचिन तेंडूलकर याला खास आमंत्रित करण्यात आले होते. मात्र १९८३ साली भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारा त्यावेळचा भारतीय संघाचा कप्तान कपिल देव यांना आमंत्रित केले नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

ऐन दिवाळीच्या धामधुमीत बारामतीत शरद पवार-अजित पवार आणि दिल्लीत ?

राज्यातील राजकिय वजनदार घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात सध्या काय सुरु आहे याची भणकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *