Breaking News

संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर कारभार चालविण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही मंत्रालयात दशसूत्रीचे अनावरण

मुंबई : प्रतिनिधी

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केले.

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली होती. त्यानुसार या मार्बल शिळेत कोरलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

भुकेलेल्यांना अन्न; तहानलेल्यांना पाणी; उघड्यानागड्यांना वस्त्र; गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत; बेघरांना निवारा, आश्रय; अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार; बेरोजगारांना रोजगार; पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय; गरीब तरुण तरुणींचे लग्न; दुःखी व निराशांना हिम्मत या बाबी दशसूत्रीमध्ये नमूद आहेत.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *