Breaking News

दिवाळीचे स्वागत इराणी गायक आणि वादकांच्या संगीताने होणार स्नेहालयात सकाळी आणि संध्याकाळी होणार

अहमदनगरः प्रतिनिधी
इराण मधून आलेले गायक आणि वादक यंदा दीपोत्सवाचे स्वागत स्नेहालय संस्थेत आयोजिण्यात आलेल्या.”व्हाईट ड्रीम” या संगीत मैफलीने करणार आहेत. येत्या शनिवारी, दिनांक १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुलात सायंकाळी पाच ते सात या वेळेत या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे .सर्व संगीत रसिकांना येथे प्रवेश मोफत आणि खुला असल्याची माहिती संयोजक श्रीमती जॉईस कोनोली , भारत कुलकर्णी , दीपक काळे ,अभिजीत क्षीरसागर, वैजनाथ लोहार यांनी दिली.
इराणी कलाकारांच्या पथकातील आमिर हसन नूरी ,हे उदयन्मुख गायक संगीतकार आणि वादक आहेत. वर्ष २०१५ पासून त्यांचा व्हाईट ड्रीम हा संगीत मंच आपल्या स्वतंत्र अदाकारीने गाजतो आहे. संगीत चिकित्सेचा उपयोग करून कर्करोग, एच आय व्ही , थलसेमिया तसेच विविध मानसिक आणि शारीरिक आजारांनी पीडित बालकांच्या वेदना कमी करणे, त्यांचे मनोबल वाढविणे, या उद्देशाने आमिर नूरी जगभर संगीताचे जलसे करीत आहेत. या कामाचे कोणतेही मानधन ‘व्हाईट ड्रीम’ संगीत मंच घेत नाही.
या कामातील आपले सहकारी आणि इराणी चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेत्री माहशाद मोझाफरी,कलाकार मोहम्मद हफेझी,माध्यम तज्ञ शायगन हल्लाज यांच्यासह आमिर नूरी ही संगीत मैफल सजविणार आहे. पुणे येथील दंतवैद्य डॉ. मानसी जाधव या कलाकारांना घेऊन पुणे येथून अहमदनगरला आल्या आहेत. इराणमध्ये आपल्या सुफी संगीत कलेचा ठसा उमटविणारे भारतीय गायक पंडित पवन नाईक यांच्या हस्ते या इराणी कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ९०११०२०१७६ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *