Breaking News

Tag Archives: ahamadnagar

आता अहमदनगर आणि मुंबईतील या रेल्वे स्थानकांच्या नामकरणाला मान्यता

आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्षांचे खासदार पराभवाच्या छायेत आल्याने मराठी भाषा आणि मराठी नावे पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुप्रतिक्षित अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी असे करण्याबरोबर मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावे असलेली रेल्वे स्थानकांची नावे आता मराठी नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …

Read More »

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर …

Read More »

अहमदनगर जिल्ह्यातील एमआयडीसीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणार उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित ‘एमआयडीसी’ सुरू करण्यासाठी पाण्याची उपलब्धता, सलग क्षेत्र, वन्यजीव संरक्षण क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन आदी तांत्रिक बाबी तपासून येत्या तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य राम शिंदे यांनी एमआयडीसी मंजुरीबाबत सद्य:स्थिती काय आहे या अनुषंगाने नियम ९७ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत शेत पीके व पडझड झालेल्या घरांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात आर्थिक मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील …

Read More »

अजित पवार यांचा गौप्यस्फोट, शिंदेच्या बंडखोरीची माहिती आधीच उध्दव ठाकरेंना दिली होती नाशिकमधील सत्यजीत तांबे यांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेतील बंडखोरीबाबत अजित पवार यांचे विधान

महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष झाल्यानंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मात्र या बंडखोरीमागे कोणते कारण आणि कशी झाली याबाबतचा खुलासा अद्याप होवू शकला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे बंडखोरी करणार असल्याचे माहिती त्यापूर्वीच थोरात यांना दिल्याचा …

Read More »

अहमदनगराच्या नामांतराची तयारी सरकारकडून सुरू, आता जिल्हा विभाजनाचीही मागणी बाहेरच्या व्यक्तीच्या मागणीवरून नामांतर नको तर स्थानिकांच्या मागणीवरून करा

अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर असे करावे, ही मागणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यानुसार राज्य सरकारने महापालिकेकडून ठराव मागविला असतानाच आता नामांतरासोबतच जिल्ह्याच्या विभाजनचा मुद्दा पुन्हा पुढे आला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी परस्पर विरोधी मते व्यक्त केली. आमदार पडळकर …

Read More »

२९ रूग्णांची वाढ, संख्या ६६४ वर पोहोचली पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, बुलढाणा, औरंगबादेत सापडले नवे रूग्ण

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आज पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद आणि बुलढाण्यात नव्याने २९ रूग्ण सापडले असून सर्वाधिक पुणे येथील आहेत. पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, बुलढाण्यात ३, औरंगाबादेत २ रूग्ण नव्याने सापडले. राज्यात …

Read More »

दिवाळीचे स्वागत इराणी गायक आणि वादकांच्या संगीताने होणार स्नेहालयात सकाळी आणि संध्याकाळी होणार

अहमदनगरः प्रतिनिधी इराण मधून आलेले गायक आणि वादक यंदा दीपोत्सवाचे स्वागत स्नेहालय संस्थेत आयोजिण्यात आलेल्या.”व्हाईट ड्रीम” या संगीत मैफलीने करणार आहेत. येत्या शनिवारी, दिनांक १९ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुलात सायंकाळी पाच ते सात या वेळेत या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे .सर्व संगीत रसिकांना येथे …

Read More »