Breaking News

‘माणूस’ ही ओळख देणाऱ्या संविधानावरच आपले अस्तित्व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी
प्रदेश असणारा भारत संविधानाच्या निर्मितीनंतर एक देश बनला. ज्यामध्ये येथील ‘मी’ पणात असणाऱ्या या देशात भारतीय लोकांना ‘माणूस’ म्हणून ओळख मिळाल्याचे सांगत ही ओळखच तुमच्या अस्तित्वाची नांदी असून आम्हा भारतीय लोकांना आमच्या अस्तित्वासाठी संविधानावर जमलेल्या काळ्याकुट्ट ढगांपासून संरक्षित करण्याचे थेट आवाहन जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
अनु. जाती / जमाती / विजा-भज / इ. मा. व. / वि. मा. व. / शासकीय निमशासकीय अधिकारी / कर्मचारी संघटनेतर्फे गुरुवार दिनांक १६ मे, २०१९ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, स्वागताध्यक्ष मनोज जाधव, उपसचिव ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई आणि कार्यक्रमाचे तथा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र आटे, सहसचिव शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई आदींची उपस्थिती होती.
यावेळी कांबळे यांनी आपल्या सविस्तर व्याख्यानात परंपरागत व्यवस्थेवर त्यांनी मिश्किल भाष्यातून परखड टीका केली. ते पुढे म्हणाले की महामानवांचा लढा हा केवळ न्यायाचा नव्हे तर सामाजिक न्यायाचा निरंतर लढा होता. या लढ्याला आम्ही समजून घेणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक भारत वानखेडे यांनी प्रास्ताविक करताना म्हणले की, या मंत्रालयात महापुरुषांची संयुक्त जयंती महोत्सव साजरा करताना मंत्रालयाच्या मुख्य सभागृहात साजरा करण्यात एक आत्मविश्वास वाटतो. संघटनेचे कार्य करताना केवळ दिवसरात्र कार्य करणेच पुरेसे नसून प्रसंगी संविधानाच्या सरंक्षणासाठी आक्रमकताही जोपासावी लागते. सर्व सामाजिक प्रवर्गांना सोबत घेऊन चालताना प्रत्येकाला सामाजिक समतेची अनुभूती यावी लागते.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मनोज जाधव, उपसचिव ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी सालाबादप्रमाणे होणाऱ्या महोत्सवातून एक नवा आत्मविश्वास मिळत असल्याचे म्हटले.
यावेळी चार सत्कारमूर्तींचा पुष्पहार आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यात डॉ. रमेश साळवे, साहित्यिक वैभव काळखैर, भिमराव जीवने आणि मंत्रालयात काम सांभाळून मराठी नाटकात आणि चित्रपटात नेपथ्य करणाऱ्या देवदत्त राऊत यांचा समावेश होता. कार्यक्रमात प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांनी भीमगीत सादर केले. तसेच भारतकुमार तांबिले हे स्वतः वंचित असलेल्या भटक्या डोंबारी समाज अध्यक्ष यांनी समाजाची व्यथा कथन करून ही मंत्रालय संघटना अशा वंचित समाजासोबत ही काम करते ही आनंदाची बाब असल्याचे म्हटले असून संघटनेसोबत काम करताना खूप आनंद होत असल्याचेही त्यांनी वक्तव्य केलं.
सर्वस्वी चुळाराम निखारे, सुभाष गवई, यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संघटनेच्या वतीने डॉ. उत्तमराव सोनकांबळे संघटनेचे राज्य सचिव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.  सदर कार्यक्रमात संघटनेच्या वतीने दिनेश डिंगळे सहसचिव, ए एस बनकर सहसचिव, सुरेश बनसोडे,राजेंद्र सवने, संजय भोसले, शंकर खूने, स्नेहलता अवनखेडकर, ममता अडांगळे, भास्कर बनसोडे, देवानंद कांबळे, राजेंद्र ढावारे के एम कांबळे, राजेश सोळंके, नीतू डावरे, रंजना वाघमारे, बिनिता त्रिलोक्य, राहूल हिवाळे व सर्व पदाधिकारी तसेच आकाशवाणी, मुंबई येथील अनु.जाती/जमाती संघटनेचे महासचिव मनिषा निखाळगे व कांबळे आणि अखिल उत्तर भारतीय बौध्द संघ, मुंबईचे अध्यक्ष ज्ञानदेव कोरवी इत्यादी उपस्थित होते.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *