Breaking News

जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? 'कम्युनिटी किचन' केंद्रावर मंत्री जयंत पाटील झाले 'वाढपी'

सांगली-मुंबई: प्रतिनिधी
ज्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून इस्लामपूर शहरातील गोरगरिबांना गेल्या १५-२० दिवसापासून ‘माणुसकीची थाळी’ भरविली जात आहे ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील ‘कम्युनिटी किचन’ना आज भेटी दिल्या. यावेळी जयंत पाटील यांनी जेवण कसे आहे? पोटभर मिळते का? असा गरजूंशी संवाद साधत काही केंद्रावर त्यांनी ‘वाढप्या’चीही भूमिका वठविली.
‘कम्युनिटी किचन’ ची संकल्पना राबवणाऱ्या व जीवाची पर्वा न करता राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी यावेळी कौतुकही केले.
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १५-२० दिवसापासून शहराच्या वेगवेगळ्या नऊ भागात ‘कम्युनिटी किचन’ सुरू करून गरजूंना ‘माणुसकीची थाळी’ सुरु आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणारे असंख्य नागरिक व परराज्यातील मजुरांचे हाल सुरू झाल्याने ही किचन सुविधा सुरू केली.
जयंत पाटील यांनी आज (शनिवार) आंबेडकर नगर, मंत्री कॉलनी, राजेबागेश्वर, मार्केट यार्ड, भाजी मंडई, घरकुल आदी भागातील ‘कम्युनिटी किचन’ ला भेटी दिल्या. त्यांच्यासमवेत उपनगराध्यक्ष दादासो पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील,नगरसेवक विश्वनाथ डांगे,जिल्हा सरचिटणीस बाळासो पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जयंत पाटील पाटील यांनी काही नागरिकांशी संवाद साधत जेवणाच्या दर्जा, प्रमाणाबद्दल त्यांच्याकडे विचारणाही केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष पै.भगवानराव पाटील,सुभाष सुर्यवंशी, नगरसेवक संग्राम पाटील,माजी नगरसेवक पीरअली पुणेकर,कृष्णेचे संचालक संजय पाटील,शैलेश पाटील, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी, पदवीधर सेलचे विशाल सुर्यवंशी, धीरज भोसले,विनायक सदावर्ते, हणमंत पाटील,पृथ्वीराज पाटील, सुहास पाटील,संदीप माने,बाळासो कोळेकर यांच्यासह पदाधिकारी,व कार्यकर्ते उपस्थित होते.

jayant patil

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *