Breaking News

नोंदणी असेल तरच सरकारी बांधकामाचा ठेका मिळणार काँट्रक्टर आणि ठेकेदारांना नोंदणी करण्याचे कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व काँट्रक्टर आणि ठेकेदारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या ठेकेदार आणि काँट्रक्टरला सरकारी काम मिळणार नसल्याची घोषणा कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी करत सर्व काँट्रक्टर आणि ठेकेदारांनी नोंदणी करावी असे आवाहनही केले.

बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर केल्यानंतर सहयाद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या ‘विशेष नोंदणी अभियाना’चा ई शुभारंभ आज करण्यात आला. आज महाराष्ट्रात जवळपास २५ लाख इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कामगार असून या कामगारांना आजपासून सुरु करण्यात आलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील  इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत बांधकाम कामगारांपैकी ज्या बांधकाम कामगारांनी अद्याप मंडळाकडे नोंदणी केलेली नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदणी करता यावी याकरीता मुंबईत २४ ठिकाणी,  पुणे येथे २५ ठिकाणी, नाशिक येथे १४  ठिकाणी,  औरंगाबाद येथे १० ठिकाणी,  अमरावती येथे ६ ठिकाणी आणि नागपूर येथे १७ ठिकाणी असे सर्व मिळून ९६ ठिकाणी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत २८ योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार असून हे अभियान  २३ फेब्रुवारी  २०१८  ते  २३ मार्च २०१८ असे महिनाभर सुरु राहणार असून

लोकप्रतिनिधी,  कामगार संघटना आणि आस्थापना,  स्वयंसेवी संस्था, यांनी विशेष नोंदणी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यात सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कामगारांच्या नोंदणीच्या अधिक माहितीसाठी कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, ई ब्लॉक, सी-२०, बांद्रा कुर्ला संकुल, ब्रांन्दा (पूर्व), मुंबई येथे संपर्क साधावा तसेच माहितीसाठी ०२२- २६५७२६३१ आणि [email protected] साधावा.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *