Breaking News

दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी सकारात्मकता-शांतता राहन्सयातही दिवाळीपूर्वी ह्या गोष्टी काढा घराबाहेर

दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर राहिली आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी करावी लागते ती दिवाळीची साफसफाई.सण-उत्सवांच्यावेळी घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ केला जातो. हात फिरे तिथ लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. म्हणूनच खास-उत्सवांच्यावेळी घर चकचकीत, स्वच्छ ठेवलं जातं. घरात स्वच्छता असेल तर घर नीटनेटकं दिसतं. कितीही साफसफाई केली तरी घर स्वच्छ दिसत नाही, पसारा दिसतो अशी अनेकांची तक्रार असते. घर स्वच्छ करताना जर काही टिप्स लक्षात ठेवल्या तर घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं दिसेल.

जुने फर्नीचर

घरातलं अनेकदा न बदलल्यामुळे फर्नीचर वर्षानुवर्ष तसंच ठेवल्यामुळे खराब होतं किंवा पाणी लागून फुगते. अशा स्थितीत बराचवेळ फर्नीचर तसंच ठेवल्याने त्यात किटक होऊ शकतात. वापरात नसलेले फर्नीचर दिवाळीची साफ-सफाई करताना काढून टाका. वापरात नसलेले फर्नीचर दुरूस्त करून तुम्ही कोणालाही वापरण्यासाठी देऊ शकता.

जुने, धुळ लागलेले तोरण काढून टाका

कोणताही चांगल्या मुर्हूतावर किंवा कोणत्याही पुजेच्या दिवशी आपण दरवाज्यावर तोरण लावतो. पण कापडाचे तोरण धूळ लागून लागून जुने, मळकट दिसू लाहतात. याशिवाय त्यावर जाळे सुद्धा लागते. मळलेले, घाणेरडे तोरण लावल्यामुळे घरातील पॉझिटिव्ही कमी होऊ शकते. अशात जर दिवाळीची साफसफाई करताना नवीन तोरणं लावून लावून डेकोरेशन करा.

जुने कपडे

न वापरलेली कपाटात असे अनेक कपडे असतात जे घट्ट असतात किंवा जास्त लूज होतात तर काही कपड्यांचा रंग निघालेला असतो तर काही कापडाने फाटकी असतात. असे कपडे साफ-सफाई झाल्यानंतर पुन्हा कपाटात ठेवणं टाळा. जुने कपडे कोणत्याही गरजू व्यक्तीला देऊ शकता किंवा जास्त खराब झाले असतील तर ते फेकून द्या.

खंडीत मुर्तीचे विजर्सन करा

अनेकदा घरात अशा मूर्ती असतात ज्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे खंडीत होतात. दिवाळीची साफ-सफाई करताना पूजा घरात जर अशा मूर्ती किंवा प्रतिमा दिसल्या तर विसर्जन करा किंवा कोणत्याही रिसायकलिंग एजंसीशी संपर्क करून तुम्ही त्यांना या मूर्ती देऊ शकता.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *