Breaking News

हाथरस घटनेनंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून नवी नियमावली भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशतील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातील महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी एक नवी नियमावली केंद्र सरकारने जारी केली. तसेच या नव्या नियमावलीची अंमलबजावणी सर्व राज्य सरकारांनी करावे अशी सूचनाही केंद्राने दिल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली.

तसेच ही नियमावली सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालातील नियमावली असून ती केंद्र सरकारने नियमावली स्वरूपात जारी केल्याचे त्यांनी सांगितले.

या नवी नियमावली पुढीलप्रमाणे

पोलिस ठाण्यात येणाऱ्या महिलेचे पहिल्यांदा तक्रार दाखल करून घेणे बंधनकारक आहे,

पोलिसांवर महिलेची तक्रार दाखल करून घेणे बंधनकारक

बलात्कार, लैगिंग अत्याचाराच्या तक्रारीची दोन महिन्यात तपास पूर्ण करणे बंधनकारक

फॉरेन्सिक पुरावे जतन करून ठेवणे पोलिसांवर बंधनकारक आहे.

 कारवाई करण्यात जे पोलिस हयगय करतील त्यांच्यांवर १६६ (ए) खाली कारवाई करणार.

या नव्या नियमावलीमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच मागील चार महिन्यापासून राज्य सरकारकडे कोविड सेंटरच्या अनुषंगाने जारी केलेल्या एसओपी आम्ही मागत आहोत. मात्र त्या अद्याप दिलेल्या नाहीत. मात्र महिला अत्याचार रोखण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने ही नियमावली जारी केल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Check Also

नाना पटोले यांचा इशारा, सांगली काँग्रेसला द्रष्ट लावणाऱ्यांची द्रष्ट उतरवल्याशिवाय…

लोकसभेच्या जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनिया गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *