Breaking News

पवारांच्या भेटीनंतर उदयनराजे भाजपात जाहीर प्रवेश करणार मोदींच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा

पुणे-मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून सत्तेत राहता यावे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या मनधरणीला बगल देत सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकृतपणे आपण भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या भेटीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपली भूमिका जाहीर केल्याने पवार आणि उदयनराजेंच्या भेटीबाबत तर्क-वितर्क सुरु आहेत.
ट्विटरच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आपण उद्या भाजपा पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केले. यामुळे उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं आहे.
ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्टर शेअर केलं आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, “आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील”,मिळालेल्या माहितीनुसार, भाजपात प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर रोजी उदयनराजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सहभागी होणार आहेत.
गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. बैठकीत उदयनराजे यांचं मन वळवण्यात शरद पवारांना यश आलं आहे असं बोललं जात होतं. पण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मी आणि मुख्यमंत्री उदयनराजेंच्या संपर्कात असून ते भाजपात येतील याबद्दल आशावादी असल्याचं सांगितलं होतं.

Check Also

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *