Breaking News

राष्ट्रवादीकडून खडसे, नाईक आणि गर्जेंनी तर भाजपाकडून खोत यांचा अर्ज भाजपाकडून सहावा उमेदवार तर राष्ट्रवादीकडून एक डमी

विधान परिषद निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. मात्र काल संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली नव्हती. मात्र बैठकांवर बैठकांचे सत्र सातत्याने सुरु होते. अखेर आज सकाळी पुन्हा एकदा पक्षाच्या नेत्यांची अंतिम बैठक होत विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.

तर दुसऱ्याबाजूला भाजपाच्या वतीने आज सकाळीच भाजपाने आपला सहावा उमेदवार जाहिर करत सदाभाऊ खोत यांच्या रूपाने सहावा उमेदवार विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणात उतरविला. या सर्वच उमेदवारांनी त्यानंतर सकाळीच विधानभवनात जाऊन आपापले उमेदवारी अर्ज भरले.

भाजपाने ऐनवेळी सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीचे मतांचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच घोडेबाजार होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. राज्यसभा निवडणूकीसाठी खुल्या पध्दतीने मतदान होणार असल्याने तेथे कोणी कोणाला मते दिली ते लगेच कळणार आहे. मात्र विधान परिषद निवडणूकीत गुप्त पध्दतीने मतदान होणार आहे. त्यामुळे कोणी कोणाला मत दिले हे कळणार नाही. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी मिळेल याची चर्चा मागील वेळीपासून सुरु होती. मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही. मात्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिलेली असली तर या दोघांपैकी एकाचा अर्ज बाद झाला तर आपली हातची जागा जाऊ नये या उद्देशाने राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांना अतिरिक्त अर्ज भरायला लावला आहे. त्यामुळे एकाबाजूला राष्ट्रवादीकडून गर्जे यांचा अर्ज हा डमी म्हणून भरण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी या अर्जाच्या आढून वेगळेच राजकारण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर दुसऱ्याबाजूला विधान परिषदेची निवडणूक सरळ पध्दतीने होण्याऐवजी त्यात चुरुस निर्माण कऱण्यासाठी आणि भाजपाचे बंडखोर नेते तथा देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक एकनाथ खडसे यांना रिंगणात उतरविणार असल्याचे स्पष्ट होता लगेच भाजपाकडून भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा आज अर्जही भरायला लावला. त्यामुळे विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आल्याचे दिसून येत आहे.

Check Also

अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचा युक्तीवाद, घोटाळ्यातील पुरावे मिळाले नाहीत

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यातून उद्भवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *