Breaking News

राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर; जाऊन घ्या कधी होणार मतदान २१ जून होणार मतदान

राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. यानुसार, राष्ट्रपती निवडणूक १८ जुलै रोजी होईल. या निवडणुकीत यंदा एकूण ४,८०९ जण मतदान करतील. विशेष म्हणजे कोणत्याही पक्षाला या निवडणुकीसाठी व्हिप जारी करता येणार नाहीये.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होईल आणि २१ जुलै रोजी मतमोजणी पार पडेल.
राष्ट्रपती निवडणुकीत एका खासदाराच्या मताची किंमत ७०० असणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांनाही मतदान करता येणार आहे. तुरुंगात असणारे खासदार पॅरोलसाठी अर्ज करू शकतात. त्यांना पॅरोल मंजूर झाल्यास त्यांना देखील या निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून कोणती भूमिका घेतली जाणार, निवडणूक बिनविरोध होणार की दोन्हीकडून उमेदवार घोषित होणार, कोणाच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आगामी काळातच मिळणार आहेत. सर्वांचेच या निवडणुकीवर लक्ष असणार आहे.

असा आहे राष्ट्रपती निवडणूकीचा कार्यक्रम

नोटिफिकेशन जारी – १५ जून २०२२

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – २९ जून २०२२

अर्ज छाननी – ३० जून २०२२

अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस – २ जुलै २०२२

मतदानाचा दिवस – १८ जुलै २०२२

मतमोजणी – २१ जुलै २०२२

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *