Breaking News

शरद पवारांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या राम सातपुतेच्या विरोधात राष्ट्रवादी आमदार आक्रमक… अखेर भाजप आमदार राम सातपुतेंनी मागितली माफी...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्‍या भाजपा आमदार राम सातपुते यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना सभागृहातच माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावावरील चर्चे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. यावेळी बोलताना आव्हाड यांनी सनातन धर्म, त्यातील रूढी, प्रथा, पंरपरांवर भाष्य करत असताना सत्ताधारी बाकावरील भाजपाचे आमदार आक्रमक होत आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात वेल मध्ये घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामध्ये भाजपाचे आमदार राम सातपुते हे सर्वात पुढे होते.
राम सातपुते यांच्या याच घोषणाबाजीचा मुद्दा पकडत जितेंद्र आव्हाड म्हणाले, राम सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. मात्र ही बाब पचनी न पडलेल्या राम सातपुतेंनी आंबेडकरांनी घटना दिली म्हणून आहे. परंतु ‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’ असा एकेरी उल्लेख केला.

राम सातपुते यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी बाकावरील राष्ट्रवादीचे सर्वच आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले आणि पवारांचा एकेरी उल्लेख करणारे वक्तव्य कामकाजातून वगळावे आणि सातपुते यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाक्य तपासून आक्षेपार्ह असेल तर वगळण्यात येईल असे सांगत राष्ट्रवादीच्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांना वक्तव्य तपासून सांगेपर्यंत असा नवीन पायंडा तयार करता आहात का असा सवाल केला.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वेलमध्येच उभे राहुन राम सातपुते यांनी माफी मागावी यासाठी राष्ट्रवादी आमदार आक्रमकच राहिले. शेवटी राम सातपुते माफी मागेपर्यंत आमदार घोषणाच देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी राम सातपुते यांना सूचना केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *