Breaking News

संजय राऊतांचा राणेंवर पलटवार, तो पादरा पावटा आहे… पळून गेलो आणि लढायच्या गोष्टी करतोय

भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली असून संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिल्यानंतर, संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या दैनिकातील अग्रलेखावरून राणेंनी संजय राऊतांना इशारा दिला आहे. त्याला संजय राऊतांनी उत्तर दिले आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनीही खरमरीत शब्दात नारायण राणे यांना इशारा देताना म्हणाले, पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो, हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदेना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात मोदींनाही अरे तुरे. हे कोण आहेत, यांची चौकशी करा. आता मी करणार, आता मी काढतो. काल पर्यंत मी संयमाने वागलो, इतके वर्षे मी. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सगळे, फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांवरती अरे तुरे, अरे तुरे कोण तुम्ही? डरपोक लोक आहात तुम्ही. तुम्ही पळून गेलात तुमच्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही? कुठंय किरीट सोमय्या आता? तुमच्या १०० बोगस कंपन्या आणि इतर सगळं बाहेर काढतो आता मी.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, कोणत्या अग्रलेखाबद्दल म्हणताय तुम्ही? वाचा नीट. परत सांगतो नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस. झालं आता मी कालपर्यंत गप्प होतो आज तू मर्यादा सोडली आहेस. तुझ्यासारखे आले ५६ आणि गेले. नामर्द माणूस आहेस तू ईडी आणि सीबीआयच्या भीतीने पळून गेलास. तू आम्हाला लढायच्या गोष्टी काय सांगोतस. तुझी लायकी आहे का? असा खोचक शब्दात इशाराही दिला.

हे राऊत विरुद्ध राणे वैगरे काही नाही, त्याला वेड लागलं आहे. तो वेड्यांच्या कळपात आहे. त्या नारायण राणेची सटकली आहे. जरी तो आमच्यावर टीका करत होता तरी मी कालपर्यंत त्याचा आदराने उल्लेख करत होतो. मी त्याला एक शब्द बोललो नाही. पण कोण आहे हा माणूस, डरपोक माणूस याचं मंत्रीपद जातयं. शिंदे गटाच्या माणसांना सामवून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रीपद जाणार आहे, म्हणून तो भैसटला आहे अशा शब्दांमध्ये टीका करत, एकप्रकारे राजकीय भाकीतही यावेळी संजय राऊतांनी केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *