Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खरे

अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देत नवनीत राणा यांचे मोची समाजाचे जात प्रमाणपत्र सत्य असल्याचा निर्वाळा देत नवनीत राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही मान्यता दिली. याशिवाय नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगितीही दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या जे के माहेश्वरी आणि संजय कारोल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र याचिकेवर निर्णय देताना वरील निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी निर्णय देताना नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा निवडणूकीत सादर केलेले जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा निर्णय दिला होता. तसेच यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेशही यावेळी दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रप्रकरणी निर्णय देताना म्हणाले की, जात पडताळणी समितीने योग्य ती कागदपत्रे तपासून अधिनियम २२६ अन्वये जात प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यामुळे या त्यात हस्तक्षेप करण्याचा आणि त्यावरील परिणामांची काळजी करणे योग्य नाही. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला परंतु राणा यांना तात्काळ अपील करण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकाल विचारात घेता येणार नाही, असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला सारत नवनीत राणा यांना मिळालेले मोची समाजाचे प्रमाणपत्र वैध असल्याचेही स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयातील नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या अपील याचिकेवर जवळपास सहा महिने निर्णय प्रलंबित होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी तातडीने सुनावणी घेत नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र योग्य असल्याचा निकाल दिला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित राहिली असल्याने नवनीत राणा यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणे शक्य नव्हते.

दरम्यान नवनीत राणा यांच्या प्रलंबित याचिकेवर सकाळी पहिल्या सत्रात नवनीत राणा यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर नवनीत राणा यांनी अमरावती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज दाखल केला.

उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र याचिकेवर निर्णय देताना नवनीत राणा यांनी बोगस जातप्रमाणपत्र सादर केल्याचा निकाल देत नवनीत राणा यांना २ लाख रूपयांचा दंडही ठोठावला होता.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *