Breaking News

राऊतांचा पाटलांना इशारा, यात पडू नका नाही तर कपडे… किरीट सोमय्याच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून संजय राऊतांचा इशारा

मराठी ई-बातम्या टीम

मुंबई पवईतील जमिन पुर्नविकास प्रकरणात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी फडणवीस यांच्या नावावर वसुली केल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेगाने शादी मे नाचू नये असे म्हणत लोक सोमय्याची धिंड तर काढतीलच पण तुमचे कपडे फाटतील असा इशारा देत या लफड्यात न पडण्याचे आवाहन शिवसेना संजय राऊत केले.

पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात बोगस ४३३ लोक घुसवित या लोकांना पुर्नवसनातून घरे मिळवून देतो असे सांगत किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पैसे द्यायचे आहेत असे सांगत अनेकांकडून पैसे वसूल केले. ही रक्कम सुमारे ३०० ते ४०० कोटींच्या घरात असून त्याबाबतची कागदपत्रे माझ्याकडे आहेत. एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही ही कागदपत्रे देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमय्यांची एकूण २११ प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावे असे खुले आव्हानही त्यांनी यावेळी सोमय्यांना दिले.

महाआयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावलं आहे. एवढा मोठा घोटाळा आहे. या लोकांना मेहूल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याप्रमाणे पळवून लावले आहे. महाआयटी घोटाळ्यातील काही प्रमुख लोकांना पळवून लावल्याची माझी माहिती आहे. अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा सांगत आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार होतो, तेव्हाच ते पळून जाण्याच्या तयारीत होते असा आरोपही त्यांनी केला..

मी जुहूच्या प्लॉटबाबत बोललो होतो. तेही बाहेर येईल. पवईचे मला भेटले. किरीट सोमय्यांच्या हातात चप्पल आहे. तेच स्वत:ला चप्पलेने मारतील. महाराष्ट्रातील लोक त्याची धिंड काढतील. तो पुढे लोकं मागे, तो पुढे लोक मागे असे चित्र निर्माण होईल सांगत कपडे काढून त्याची धिंड काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पेरुबाग पास्कोली येथे १३८ एकरचा भूखंड आहे. त्याने साफ केला. पुनर्वसनाच्या नावाखाली ४३३ बोगस लोकांना आत घुसवले. किरीट सोमय्यांच्या एजंटांनी या पुनर्वसन प्रकल्पात बोगस लोकांना आत घुसवले. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. ओरिजनल व्हिक्टीम आहेत, त्यांना धमकावले आहे. पवई पेरुबागच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पावर फडणवीसांनी सही केली. सोमय्या आणि त्यांच्या एजंटांनी ४३३ लोकांकडून प्रत्येकी २५-२५ लाख रुपये घेतले. म्हणजे २०० ते ३०० कोटी रुपयांचा हा व्यवहार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *