Breaking News

संजय राऊतांच्या जामीनावर अर्जावर तारीख पे तारीख पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती मात्र आज होणारी सुनावणी आता २१ ऑक्टोबरला होणार असल्याने त्यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे.

राऊत यांच्या जामीन अर्जावर आता येत्या २१ तारखेला सुनावणी होणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती.तेव्हा पासुन ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

संजय राऊत यांना आर्थर रोड कारागृहामध्ये ठेवण्यात आले असून. आज त्यांना पुन्हा एकदा ईडी न्यायालयात हजर केले होते. राऊत यांचा जामीन अर्जावर नियमित सुनावणी एकाचवेळी सुरू झाली. ईडीकडून सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला. सायंकाळपर्यंत संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरंगी यांच्याकडून काही मुद्दे लेखी सादर करणार आहे. हे प्रकरण अत्यंत किचकट आणि गुंतागुंताचे असल्यानं त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे, असं कोर्टाने स्पष्ट केलं. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २१ ऑक्टोबर पर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे.त्यामुळे राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबई गोरेगाव येथील पत्राचाळ येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील ६७२ रहीवाशांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स कंपणीची रहिवाशांनी नियुक्ती केली.मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून ६७२ फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते.

मात्र २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून १०० कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. २०१० मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील ५५ लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत.वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *