Breaking News

पालकमंत्री बडोलेंमुळे आता गोंदियातही विमानसेवा सुरु होणार

विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांचे मंत्री बडोले यांना आश्वासन

नवी दिल्ली : प्रतिनिधी 

अतिदूर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नागरी विमान सेवेने जोडण्याची प्रक्रिया लवकरच आकाराला येईल, असा विश्वास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्हा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे व्यक्त केला.

 बुधवार दिनांक २३ रोजी बडोले यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर आज ते मुंबईत पत्रकारांना याबाबतची माहिती देत होते.

 ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडण्याची मागणी केली. गोंदिया जिल्हा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त असल्यामुळे तसा दुर्लक्षित राहिलेला आहे. मात्र या जिल्ह्याला लाभलेली वनसंपदा, वन्यजीवसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे ते पर्यटनाचे केंद्र बनल्याची  बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय देशातील दुर्मिळ असलेल्या सारस पक्षाचे गोंदिया जिल्हा आश्रयस्थान असल्यामुळे या पक्षाच्या दर्शनासाठी देशविदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी सुरू असते. गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे कमी आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील हे सुरेश प्रभू यांच्या निर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जाडण्यात येईल,अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे बडोले यांनी सांगितले.

 गोंदिया जिल्हा वनसंपत्तीने नटलेला जिल्हा आहे. येथील ऐतिहासिक मामा तलाव, प्रसिध्द अभियारण्ये, पाणसाठे, तलाव यामुळे आकर्षणाचे ठिकाण आहे. येथील हवामानामुळे धानातील रूचकर असलेला तांदूळ पिकतो. देशातील दुसरा आणि राज्यतील पहिला राईस पार्कसुध्दा येथे प्रस्तावित आहे. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. भरतीपूर्व सैनिक प्रशिक्षण, दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे गोंदिया जिल्हा नागरी विमान सेवेने जोडल्यास गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा असेल असेही बडोले यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, एखाद्या हुकूमशहासारखं मोदींचा राज्यकारभार

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *