Breaking News

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राज ठाकरेंची भूमिका राज्यावरून राष्ट्रीय होतेय (?) राज्यातील नागरीकांना देशवासिय म्हणून विचार करण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणातील स्पष्ट भूमिका आणि नेमके मुद्दे मांडणारे नेते म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते. आतापर्यंत राज ठाकरे यांनी राज्याची मातृभाषा मराठी माणूस यासह स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा सातत्याने मांडत आलेले आहेत. मात्र यंदा १५ ऑगस्ट आणि स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करताना त्यांनी पहिल्यांदाच राज्यातील नागरीकांना देश म्हणून विचार करण्याचे आवाहन करत झालेली प्रगती सर्वसमावेशक होवू शकली का? सर्व राज्यांना त्याचा लाभ मिळाला का? असे धीरगंभीर प्रश्न करत आधी एक देश म्हणून करायला पाहिजे असे आवाहन करत ट्विटरवरून स्वातंत्र्य दिनाच्या जनतेला शुभेच्छा देत काही प्रश्नांवर नव्याने भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे हे आता राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात प्रवेश तर करणार नाही ना? अशी शंका उपस्थित करत कदाचित आगामी निवडणूकीच्या निमित्ताने संभाव्य भाजपाबरोबरील युतीच्या पार्श्वभूमीवर भूमिकेत बदल तर केला नाही ना अशी चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

असंतुलीत प्रगती आणि विकासामुळे आज देशापुढे नवीनच प्रश्न उभे राहिले आहेत. महाप्रचंड लोकसंख्या, शेती पुढील आव्हानांमुळे उद्योग सेवा क्षेत्रावर रोजगार निर्मितीचा आलेला ताण, शिक्षण व रोजगार संधी यामधील समन्वयाचा अभाव आणि यातूनच होणारे महाभयानक स्थलांतर ! हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुकड्या-तुकड्यात विचार करून चालणार नाही. त्यांना समग्रतेने भिडावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी एक देश म्हणून आपल्याला विचार करावा लागेल असे सांगत  बेरोजगारीमुळे मुंबई आणि महाराष्ट्रात होत असलेल्या स्थलांतराचा आणि रोजगाराचा विषय त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला.

गेली सात दशकं आपल्या देशात रस्ते, पाणी, वीज या मुलभूत विषयांवर निवडणूका लढवल्या जात  आहेत. आत्ता आत्ता त्यावर कुठे शिक्षण आणि आरोग्यावर आपल्याकडे चर्चा सुरु झालीये…प्रदुषण, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन यामध्ये जागतिक पातळीवर काय चिंतन सुरु आहे, याची आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींना साधी कल्पनाही नसावी. पण सुदैवाने तरूण पिढी या प्रश्नांबाबत जागरूक आहे. जगातल्या घडामोंडीवर बारीक लक्ष ठेवून असलेली तरूण पिढी आपल्या देशात नेमकं काय ‘मिसिंग’ आहे, हे बरोबर ओळखून आहे. या पिढीला जपायला हवं असे सांगत मनसेकडून तरूणांना आकर्षित करण्यासाठी पुढील रणनीती आखणार असल्याचे संकेत त्यांनी दिली.

देशात आणि आपल्या राज्यातही सर्वच पातळ्यांवर सुरु असलेल्या द्वेषमुलक प्रचारामुळे या तरूण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये, उलट सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून ‘सत्यमेव जयते’ चा नारा बुलंद करण्याचं बळ त्यांच्या अंगी यावं, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं ही काळाजी गरज असल्याचे सांगत आगामी काळात मनसेच्या राजकारणात तरूणांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

सात दशकांत जे व्हायचं होतं ते झालं, पण आता यापुढच्या प्रत्येक दशकात काय करायचं ते आपल्या आपल्या हातात आहे. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या हातात ! असल्याची जाणीव राज्यातील जनतेला करून दिली.

स्वातंत्र्यदिनानिमित्त मनसेच्या आगामी राजकिय वाटचालीचे संकेत जवळपास राज ठाकरे यांनी आपल्या संदेशातून दिले आहेत. त्यामुळे मनसेची भूमिका बदलतेय असे वाटल्यास त्यात नवल वाटतू नये.

Check Also

जयंत पाटील यांच्या टीकेवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ते त्यांचे कामच पण… बिन खात्याचे मंत्री करणार ध्वजारोहण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाही अद्याप मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात आलेले नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Leave a Reply

Your email address will not be published.