Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा खोचक सल्ला,… अॅटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभव…

देशातील लोकशाही संकटात असल्याचा आणि भाजपा, नरेंद्र मोदी यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यघटनेनुसार चालणारी प्रक्रियाच संकटात आली असल्याचा आरोप काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. तसेच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा २०२४ च्या निवडणूकीत पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्याचे वृत्त आज हाती आले. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला खोचक सल्ला दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल मायक्रोब्लोगिंक साईटवर ट्विट करत म्हणाले की, काँग्रेसने बिहारमध्ये पाचपेक्षा अधिक जागा लढवू नयेत,”मोठा भाऊ” असण्याचा ॲटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावे असा खोचक सल्ला काँग्रेसला दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘बिहारमधील दलित विभागाच्या मतदारांचा अभिप्राय असा आहे की जर महागठबंधनला मोदींचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसने बिहारमध्ये पाचपेक्षा जास्त जागा लढवू नयेत. २०१९ मध्ये काँग्रेसने नऊ जागा लढवल्या आणि फक्त एकच जिंकली. २०२० च्या बिहार विधानसभेत काँग्रेसने ने ७० जागा मागितल्या, ज्या लालूंच्या नेतृत्वाखालील ऱाजद ने त्यांना दिल्या पण काँग्रेस फक्त १९ जागा जिंकू शकली अशी आठवणही करून दिली.

तसेच प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, देशाच्या हितासाठी, ४० लोकसभेचे खासदार निवडून देणाऱ्या बिहार मध्ये काँग्रेसने जास्तीत जास्त पाच जागा लढवल्या पाहिजेत. काँग्रेसने आता “मोठा भाऊ” असण्याचा ॲटीट्युड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावे’,असा खोचक सल्लाही दिला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उबाठा गटाबरोबर असलेल्या युतीची आठवण करून देत नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या पराभवासाठी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच आगामी लोकसभा निवडणूकीतील संभाव्य जागा वाटपाचा प्रस्ताव महाविकास आघाडीला देत तिन्ही पक्षांनी समसमान अर्थात १२ जागा लढविण्याचा प्रत्साव महाराष्ट्रातील मतदारसंघाच्या अनुषंगाने लढवाव्याच्या अनुषंगाने प्रस्तावही दिला. परंतु त्यावर अद्याप महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *